Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : मंत्रिपदाचा पदभार स्विकारताच चव्हाणांचा पहिला कॉल 'त्या' बापमाणसाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2020 13:39 IST

आपल्या लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा

मुंबई - काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि सार्वजनिक बांधकाममंत्री अशोक चव्हाण यांनी मंत्रालयातील कार्यालयात जाऊन आपला पदभार स्विकारला. आपल्या पदाचा कार्यभार स्विकारल्यानंतर चव्हाण यांनी पहिला फोन लाडक्या लेकीच्या पित्याला केला. नागेश पाटील असे त्यांचे नाव असून Umesh@mutal या त्यांच्या भावाच्या ट्विटर हँडलवरुन त्यांनी अशोक चव्हाण यांचे आभारही मानले आहेत. नागेश यांनी अशोक चव्हाणांकडे एक कॉल करण्याची विनंती केली होती.

आपल्या लेकीला लक्ष्मी मानून तिच्या पदस्पर्शाने नवीन गाडीची पूजा करणाऱ्या पित्याचा व्हिडिओ मी काल शेअर केला होता. जो आपल्या नव्या गाडीची पूजा मुलीच्या पदस्पर्शाने करतोय. दोन मुलींचा बाबा असल्याने बाप-लेकीचं नातं काय असतं, त्यातील ओलावा काय असतो, याची मला जाणीव आहे. या बाप-लेकीला भेटायला मला नक्कीच आवडेल! असे ट्विट अशोक चव्हाण यांनी केलं होतं. अशोक चव्हाण यांच्या ट्विटला या व्हिडिओतील बापमाणसाने ट्विट करुन रिप्लाय दिला. तसेच, आपला मोबाईल नंबरही दिला व माझ्या लहान भावासाठी कृपया शक्य असेल तर एक कॉल करावा, अशी विनंतीही केली होती. 

टिकटॉकवरील हा व्हिडीओ पाहिल्यानंतर, हा व्हिडीओ बनवणारे नागेश पाटील यांचा नंबर मला रात्री मिळाला. मी आज मंत्रालयातून कामकाजास सुरूवात केली व पहिला फोन त्यांनाच केला, असे अशोक चव्हाण यांनी आपल्या ट्विटर अकाऊंवरुन सांगितले. तसेच, पहिल्या फोन कॉलचा व्हिडीओही त्यांनी शेअर केला आहे.   

टॅग्स :अशोक चव्हाणमंत्रीट्विटरमुंबईकार