'तो माझा बॉयफ्रेंड होता, तु का मध्ये पडलीस?'; तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, Video व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 13, 2021 21:01 IST2021-08-13T20:53:30+5:302021-08-13T21:01:28+5:30
संबंधित घटना ही बुधवारी (11 ऑगस्टला) घडली होती. पण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी काही तरुणांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली.

'तो माझा बॉयफ्रेंड होता, तु का मध्ये पडलीस?'; तरुणींची फ्री-स्टाईल हाणामारी, Video व्हायरल
मुंबई: विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्विस रोडवर तीन तरुणींचा फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. ''तो माझा बॉयफ्रेंड होता. माझं त्याच्यासोबत सुरु होतं. तर तू का मध्ये पडलीस?'' असा सवाल करत तरुणी दुसऱ्या तरुणीला प्रचंड मारहाण करताना दिसत आहे.
विक्रोळीच्या सर्विस रोडवर एका तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत येऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला त्या ठिकाणी गाठलं. पुढे तिला बॉय फ्रेंडसोबत का फिरतेस अशी विचारणा करत बेदम मारहाण केली.
संबंधित घटना ही बुधवारी (11 ऑगस्टला) घडली होती. पण तिथे उपस्थित असलेल्या प्रत्यक्षदर्शी काही तरुणांनी ही घटना मोबाईलच्या कॅमेऱ्यात कैद केली. नंतर संबंधित व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला.
नेमकं प्रकरण काय?
विक्रोळीच्या पूर्व द्रुतगती मार्गावरील सर्व्हिस रोडवर तीन तरुणींचा फ्री-स्टाईल हाणामारीचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. विक्रोळीच्या सर्व्हिस रोडवर नेहमीच संध्याकाळच्या वेळेस प्रेमी युगुलांचा राबता असतो.
अशात विक्रोळीतच राहणाऱ्या एका तरुणीने तिच्या मैत्रिणीसोबत येऊन तिच्या बॉयफ्रेंडसोबत फिरणाऱ्या मुलीला त्याठिकाणी गाठलं. तिला माझ्या बॉयफ्रेंडसोबत का फिरतेस? अशी विचारणा करत बेदम मारहाण करण्यास सुरुवात केली.