Join us

मुंबईकरांना पहाटेच भाजीपाला पोहोचणार; धान्य, मसाला, फळ मार्केट राहणार बंद

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 20, 2024 05:48 IST

विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे.

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमधील चार मार्केट बुधवारी विधानसभा निवडणुकीमुळे बंद राहणार आहेत. भाजीपाला मार्केट मध्यरात्रीपासून  सकाळी ७ पर्यंत सुरू राहणार आहे. मुंबई, नवी मुंबईकरांना भाजीपाला सुखरूप वितरित करून कामगार व व्यापारी मतदानासाठी जाणार आहेत. 

विधानसभेसाठी सर्वांना मतदान करता यावे, यासाठी अनेक खासगी आस्थापनांनीही सुट्टी जाहीर केली आहे. बाजार समितीमधील धान्य, मसाला, कांदा व फळ मार्केटमधील व्यापारीही व्यवसाय बंद ठेवणार आहे. 

भाजीपाला मार्केट रात्री २ नंतर सुरू होते व सकाळी ९ ते १०  वाजण्यापूर्वी सर्व व्यवहार बंद होत असतात. 

निवडणुकीमुळे पहाटे ७ पर्यंत सर्व व्यवहार पूर्ण करून मतदानासाठी जाण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे शहरवासीयांना सुरळीत भाजीपाला पोहोचणार असून, सर्वांना मतदानाचा हक्कही बजावता येणार आहे.

टॅग्स :महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४मुंबई विधानसभा निवडणूकनिवडणूक 2024मुंबई