Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी पुरवठ्यामुळे भाज्यांचे दर वाढले; मुंबईकरांचे खिशाला कात्री

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2019 01:12 IST

आवक घटली : अवकाळी पावसाचा परिणाम

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्यात ठिकठिकाणी सुरू असलेल्या अवकाळी पावसामुळे पिकांचे नुकसान झाले आहे. या पावसामुळे मुंबईतील भाज्यांची आवक घटली आहे. भाजीपाला पुरवठ्यावरही परिणाम झाल्याने भाज्या महागल्या आहेत. मुंबईत राज्यातील विविध जिल्ह्यातून भाजीपाल्याचा पुरवठा करण्यात येतो. यामध्ये नाशिक, सातारा, पुणे, सांगली कोल्हापूर येथून जास्त प्रमाणात भाजीपाला येतो. परंतु गेले काही दिवस या जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस झाला आहे. येथून भाज्यांच्या गाड्या येऊ शकल्या नाहीत.

गेल्या काही दिवसांपासून पावसामुळे भाजीपाल्याच्या गाड्या येत नसून भाजीपाला कमी येत असल्याने दर वाढले आहेत असे दादर येथील भाजी विक्रेता सुरज पाटील यांनी सांगितले. गाड्यांची आवक कमी आहे, तसेच मागणीही कमी आहे. दिवाळीत अनेक जण गावी, बाहेर जातात. त्यामुळे मागणी कमी आहे. एक-दोन दिवसात मागणी पुन्हा वाढेल आणि त्या प्रमाणात भाजीपाल्याची आवक झाली नाही तर भाजीपाल्याचे दर आणखी वाढू शकतात. - संतोष सुतार, भाजी विक्रेतासर्वच भाज्या महागल्या : पावसामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाली आहे. पालेभाज्या , कोबी ,भेंडी सर्वच भाज्यांमध्ये ५ ते १० रुपयांची वाढ झाली आहे. - वर्षा पाटील, ग्राहक

पूर्वीचे दर सध्याचे दर(प्रतिकिलो रुपयांमध्ये)भेंडी २० - ४०हिरवी मिरची २० - ४ ०मेथी २० ४० ते ५० रुपये जुडीशिमला मिरची ३० -  ४० ते ४५वांगी २० - ५० ते ५५भोपळा १६ -  २४सुरण २० -  २८

टॅग्स :पाऊसभाज्या