Join us
Daily Top 2Weekly Top 5

वर्षा राऊत ईडीच्या कार्यालयात गैरहजर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2021 06:22 IST

वर्षा राऊत यांची ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली. पीएमसी बँक घोटाळ्यात मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यातून बारा वर्षांपूर्वी ५० लाख वर्षा यांच्या खात्यावर वर्ग झाले

मुंबई :  शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत या सोमवारी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी) चौकशीस गैरहजर राहिल्या. दरम्यान, त्या आज, मंगळवारी ईडी कार्यालयात हजर राहण्याची शक्यता आहे. 

वर्षा राऊत यांची ४ जानेवारीला ईडीने चौकशी केली. पीएमसी बँक घोटाळ्यात मनी लाँड्रिंग गुन्हा दाखल असलेल्या प्रवीण राऊत यांच्या खात्यातून बारा वर्षांपूर्वी ५० लाख वर्षा यांच्या खात्यावर वर्ग झाले. त्यांच्या चार कंपन्यांत वर्षा यांची भागीदारी असल्याचा संशय ईडीला आहे. 

टॅग्स :संजय राऊतअंमलबजावणी संचालनालय