एचएसआरपी नंबर प्लेट महिनाभरात निखळते
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2025 11:38 IST2025-08-16T11:37:52+5:302025-08-16T11:38:53+5:30
परमनंट रिव्हेट्सच्या ऐवजी काळ्या रंगाच्या फ्रेमचा वापर

एचएसआरपी नंबर प्लेट महिनाभरात निखळते
मुंबई : एप्रिल २०१९ पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांवर उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक पाटी (एचएसआरपी) बसविणे बंधनकारक आहे. मात्र, अनेक वाहनधारकांच्या तक्रारीनुसार, फिटमेंट सेंटरवर बसवणी प्रक्रियेत मोठा हलगर्जीपणा होत आहे.
परमनंट रिव्हेट्सच्या ऐवजी काळ्या रंगाच्या फ्रेमचा वापर करून प्लेट बसवली जाते आणि त्यासाठी वाहनधारकांकडून जादा पैसे घेतले जातात. परिणामी या प्लेट काही दिवसांतच निघून जातात आणि वाहनाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. नियमांनुसार, एचएसआरपी नंबरप्लेट बसवताना स्टेनलेस स्टील बोल्ट किंवा केवळ फ्रेमच्या साहाय्याने प्लेट लावणे बेकायदेशीर आहे. किंवा अॅल्युमिनियम परमनंट रिव्हेट्स वापरणे अनिवार्य आहे. साधे स्क्रू, तरीदेखील कमाईसाठी जादा फ्रेममध्ये बसवून आणि स्क्रू किंवा तार लावून प्लेट बसवण्याची पद्धत वापरण्यात येत आहे. परिवहन विभागाकडून फिटमेन्ट सेंटरवर प्रक्रियेची योग्य तपासणी न झाल्याने ही समस्या कायम असल्याचे चित्र आहे.
५३ लाखांहून अधिक ऑर्डर
राज्यातील झोननुसार एचएसआरपी बसवण्यासाठी कंत्राटदार नेमले गेले आहेत. आतापर्यंत ३० लाखांहून अधिक वाहनांवर प्लेट बसवण्याचे काम पूर्ण राज्यातील झोननुसार एचएसआरपी आले असून, ५३ लाखांहून अधिक प्लेटच्या ऑर्डर्स प्राप्त झाल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
फ्रेमसाठी अधिकचे पैसे
एचएसआरपीच्या किमती शासनाने ठरवून दिल्या आहेत. त्यानुसार दुचाकीसाठी ५३१ आणि चारचाकीसाठी ८७९ आहे. असे असताना फिटमेन्ट सेंटरवर अधिकचे १५० ते ३०० रुपये घेऊन काळ्या रंगाची प्लास्टिकची फ्रेम देण्यात येते.
वाहनधारकांना "प्लेट कोपऱ्यांना वाकू नये म्हणून ही फ्रेम आवश्यक आहे", असे सांगितले जाते, पण यामुळे प्लेट योग्यरीत्या सुरक्षित बसत नाही.
एचएसआरपी बसवण्याची योग्य पद्धत काय ?
वाहनांची जुनी नंबरप्लेट नुकसान टाळून व्यवस्थित काढणे.
नवीन नंबरप्लेट स्टेनलेस स्टील किंवा अॅल्युमिनियम धातूच्या परमनंट रिव्हेट्स वापरणे.
साध्या स्क्रूज, बोल्ट वापरणे टाळणे.
प्लेट पूर्णपणे सरळ व मध्यभागी बसवणे, तिरपी किंवा वाकडी असू नये.