Urmila Matandekar's name discussed for Legislative Council candidature; Shiv Sena secretary had sincerely inquired | उर्मिला माताेंडकर यांच्या नावाची विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चा

उर्मिला माताेंडकर यांच्या नावाची विधान परिषद उमेदवारीसाठी चर्चा

मुंबई : विधान परिषदेच्या उमेदवारीसाठी अभिनेत्री उर्मिला माताेंडकर यांच्या नावाचीही सध्या चर्चा सुरू आहे.
२०१९च्या लोकसभा निवडणुकीत उत्तर मुंबईतून विद्यमान खासदार गोपाळ शेट्टी यांनी अभिनेत्री उर्मिला मातोंडकर यांचा पराभव केला होता. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी निवडणुकीत कामे केली नसल्याची तक्रार मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष मिलिंद देवरा यांच्याकडे माताेंडकर यांनी केली होती. मात्र पक्षाने त्यांच्यावर कारवाई केली नाहीच, उलट त्यांना पदे दिली. त्यामुळे त्या काँगेस पक्षावर नाराज होत्या. 
उत्तर मुंबईतील काँग्रेसच्या अंतर्गत राजकारणाला कंटाळून सप्टेंबर २०१९ मध्ये त्यांनी काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याकडे दिला होता. त्यानंतर आठ दिवसांनी शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांनी त्यांची फोनवर आस्थेने चौकशी केली होती. 
यासंदर्भात ‘लोकमत’च्या अंकात वृत्त  प्रसिद्ध होताच राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा झाली होती.

मुख्यमंत्री ठाकरे यांच्या  निर्णयाकडे लक्ष 
अभिनेत्री कंगना रनाैतविरोधात त्यांनी ट्विट करून महाआघाडी सरकारची बाजू घेत आक्रमक भूमिका घेतली होती. आता राज्यपाल नियुक्त कोट्यातून शिवसेनेच्या विधान परिषदेच्या उमेदवार म्हणून त्यांच्या नावाची जोरदार चर्चा सध्या राजकीय वर्तुळात आहे. मात्र, त्यांना शिवसेनेतर्फे विधान परिषदेची उमेदवारी मिळणार का? याचा सर्वस्वी निर्णय मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घेणार असून याचे उत्तर येत्या सोमवारी मिळण्याची शक्यता आहे.
 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Urmila Matandekar's name discussed for Legislative Council candidature; Shiv Sena secretary had sincerely inquired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.