३१ ऑगस्टपर्यंत होणार तातडीच्या सुनावणी, उच्च न्यायालयाने काढले परिपत्रक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2020 07:14 AM2020-07-17T07:14:59+5:302020-07-17T07:17:28+5:30

या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने, दिवाणी व सत्र न्यायालयाने दिलेले अंतरिम आदेश ३१ आॅगस्टपर्यंत कायम राहतील, असे स्पष्ट केले.

Urgent hearing to be held till August 31, circular issued by High Court | ३१ ऑगस्टपर्यंत होणार तातडीच्या सुनावणी, उच्च न्यायालयाने काढले परिपत्रक

३१ ऑगस्टपर्यंत होणार तातडीच्या सुनावणी, उच्च न्यायालयाने काढले परिपत्रक

Next

मुंबई : राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने उच्च न्यायालय, दिवाणी व सत्र न्यायालयात ३१ आॅगस्टपर्यंत केवळ तातडीच्या प्रकरणांवरच सुनावणी घेण्यात येईल, असे परिपत्रक मुख्य न्या. दीपांकर दत्ता यांच्या अध्यक्षतेखालील पूर्णपीठाने जारी केले आहे. त्यामुळे न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू होण्यास आणखी एक महिना वाट पाहावी लागेल.
या परिपत्रकाच्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाने, दिवाणी व सत्र न्यायालयाने दिलेले अंतरिम आदेश ३१ आॅगस्टपर्यंत कायम राहतील, असे स्पष्ट केले.
मार्चमध्ये लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्यानंतर उच्च न्यायालयाने २६ मार्च रोजी असे परिपत्रक काढले होते.
१५ एप्रिलनंतर ३० एप्रिल आणि त्यानंतर कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव विचारात घेऊन वेळोवेळी अशी परिपत्रके काढण्यात आली. आता ही मुदत १५ जुलैला संपली म्हणून न्यायालयाने थेट ३१ आॅगस्टपर्यंत न्यायालयाचे नियमित कामकाज सुरू होणार नसल्याचे स्पष्ट केले.

Web Title: Urgent hearing to be held till August 31, circular issued by High Court

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.