मेट्रो-१ मार्गावर मासिक पासद्वारे करता येणार अमर्यादित प्रवास
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2020 06:19 IST2020-01-24T06:19:26+5:302020-01-24T06:19:51+5:30
घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-१ मार्गिकेवरील पासधारकांना आता मेट्रो-१ मार्गावर कितीही वेळा (अमर्यादित) प्रवास करता येणार आहे.

मेट्रो-१ मार्गावर मासिक पासद्वारे करता येणार अमर्यादित प्रवास
मुंबई : घाटकोपर ते वर्सोवा दरम्यान धावणाऱ्या मेट्रो-१ मार्गिकेवरील पासधारकांना आता मेट्रो-१ मार्गावर कितीही वेळा (अमर्यादित) प्रवास करता येणार आहे. यामुळे या मार्गावर दररोज प्रवास करणा-या प्रवाशांना दिलासा मिळेल.
मेट्रो-१ मार्गिकेवरील तिकिटांच्या दरांवरून रिलायन्स इन्फ्रास्ट्रक्चरला टीका सहन करावी लागत होती. त्यानंतर आता त्यांनी मासिक पासवर अमर्यादित प्रवासाची घोषणा केली आहे. ही सेवा सुरू झाली असून आतापर्यंत प्रवाशांना ७७५ ते १३७५ रुपयांपर्यंत फक्त ४५ वेळाच मेट्रोमधून प्रवास करता येत होता, मात्र आता गुरुवारपासून सुमारे २५ रुपये अतिरिक्त खर्च करून ३० दिवसांपर्यंत कितीही वेळा अमर्यादित प्रवास करता येईल.