'दुर्दैव... पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ सरकारवर आलीय'
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 16:12 IST2021-08-24T16:11:32+5:302021-08-24T16:12:08+5:30
पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला होता. मात्र, नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी अखेर राणेंना अटक केली असून त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे

'दुर्दैव... पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ सरकारवर आलीय'
मुंबई - राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना रत्नागिरी पोलिसांनी अटक केली आहे. नारायण राणे यांच्याविरोधात नाशिकमध्ये गुन्ह्याची नोंद झाली आहे. त्यानंतर राणेंच्या अटकेचे आदेश नाशिक पोलीस आयुक्तांनी दिली होते. केंद्रीयमंत्री आणि भाजपा नेते नारायण राणेंना अटक झाल्यामुळे देशभर खळबळ उडाली आहे. तर, भाजपा नेत्यांकडून राज्य सरकार टीका करण्यात येत आहे. माजी मंत्री आणि भाजपा नेते डॉ. संजय कुटे यांनीही ठाकरे सरकारला लक्ष्य केलंय.
पोलिसांकडे कोणतंही अटक वॉरंट नसल्याचा दावा भाजप नेते प्रमोद जठार यांनी केला होता. मात्र, नाशिक पोलिसांच्या सूचनेनुसार रत्नागिरी पोलिसांनी अखेर राणेंना अटक केली असून त्यांना रत्नागिरी कोर्टात हजर केलं जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. सध्या राणेंना संगमेश्वर पोलीस ठाण्यात नेण्यात आलं आहे. राणेंच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. डॉ. संजय कुटे यांनी ट्विट करुन राज्य सरकारवर निशाणा साधला आहे.
पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे यापेक्षा जास्त महाराष्ट्राचे दुर्दैवी काय असू शकते. पुन्हा बळाचा वापर केला जातोय, असे कुटे यांनी म्हटले आहे. तर, सुनिल देवधर यांनीही ट्विट करुन शिवसेनेचं हे तालिबानी रूप असल्याचं म्हटलंय. शर्जिल उस्मानी समोर शिवसेनेने गुढघे टेकून सपशेल शरणागती पत्करली आणि नारायण राणेंसमोर पुरुषार्थ दाखवते आहे, असे देवधर यांनी म्हटलं आहे.
पोलिसांच्या जीवावर राज्य करण्याची वेळ राज्य सरकारवर आली आहे यापेक्षा जास्त महाराष्ट्राचे दुर्दैवी काय असू शकते. पुन्हा बळाचा वापर केला जातोय. @BJP4Maharashtra
— Dr.Sanjay Kute- डॉ.संजय कुटे (@DrSanjayKute) August 24, 2021