Join us

दुर्दैवी घटना! ग्रीलचे काम करताना इमारतीवरुन पडल्याने वडिल अन् मुलाचा करूण अंत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2018 23:06 IST

वर्सोवा येथील सात बंगला ठिकाणच्या आवारातील सागर कन्या बिल्डींग फ्लॅट नं-603 येथे ही दुर्दैवी घटना घडली. या इमारतीतील सहाव्या माळ्यावर ग्रीलचे काम करीत

मुंबई - वर्सोवा येथील एका इमारतीत ग्रीलचे काम सुरू असताना खाली पडून बाप-लेकाच मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. किशोर कृष्णा जाधव, वय (35 वर्षे) हे त्यांचे वडील कृष्णा दिनकर जाधव (62 वर्षे) अशी दोघांची नावे आहेत. घटनेनंतर दोघांनाही डॉक्टरांकडून तपासण्यात आले. मात्र, तोपर्यंत त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. 

वर्सोवा येथील सात बंगला ठिकाणच्या आवारातील सागर कन्या बिल्डींग फ्लॅट नं-603 येथे ही दुर्दैवी घटना घडली. या इमारतीतील सहाव्या माळ्यावर ग्रीलचे काम करीत असताना ग्रील तुटून वडिलांसह खाली पडल्याने वडिल आणि मुलाचा करूण अंत झाला. या अपघातानंतर दोघांनाही डॉ. हिना एस अल्वानी यांनी घटनास्थळावर मृत घोषित केले. त्यानंतर, ADR क्र. 81/18 आणि 82/18 अन्वये मृत्युची नोंद करण्यात आली आहे.  

टॅग्स :इमारत दुर्घटनामृत्यूमुंबई