भूमिगत कचराकुंड्यांनी मुंबईचे रूपडे पालटणार!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 05:56 AM2019-03-31T05:56:26+5:302019-03-31T05:56:45+5:30

दक्षिण मुंबईतील प्रयोग यशस्वी । आवश्यकतेनुसार पालिका बसविणार डबे

The underground garbage will change Mumbai! | भूमिगत कचराकुंड्यांनी मुंबईचे रूपडे पालटणार!

भूमिगत कचराकुंड्यांनी मुंबईचे रूपडे पालटणार!

Next

शेफाली परब-पंडित 

मुंबई : गल्लीच्या नाक्यावर भरून वाहणारी कचराकुंडी, त्यातून येणारी दुर्गंधी असे मुंबईतील काही विभागातील चित्र आता बदलणार आहे. दक्षिण मुंबईतील प्रयोग यशस्वी ठरल्यामुळे संपूर्ण मुंबईत आवश्यकतेनुसार महापालिका भूमिगत कचऱ्याचे डबे बसविणार आहे. त्यामुळे कुचराकुंडीजवळून जाताना मुंबईकरांना यापुढे नाक मुठीत घेऊन जावे लागणार नाही. तसेच रोगराई पसरण्याचा धोकाही टळणार आहे.

आंतरराष्ट्रीय दर्जाचे मुंबई शहर स्वच्छ ठेवण्यासाठी ‘स्वच्छ मुंबई अभियाना’अंतर्गत अनेक प्रयोग महापालिका करीत आहे. त्यानुसार मुंबईतील कचऱ्याचे प्रमाण कमी करण्यासाठी गेल्या वर्षभरात अनेक उपक्रम राबविण्यात आले. यामध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरण करणे, मोठ्या सोसायट्या व आस्थापनांना त्यांच्या आवारातच कचºयावर प्रक्रिया करण्याची सक्ती करण्यात येत आहे.
नाक्यानाक्यांवर भरून वाहणाºया कचरापेट्या स्वच्छ ठेवणेही महापालिकेपुढे मोठे आव्हान आहे. यावर उपाय म्हणून भूमिगत कचºयाचे डबे बसविण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने आॅगस्ट २०१८ मध्ये घेतला. हे कचºयाचे डबे जमिनीखाली असल्याने त्यातून दुर्गंधीचा प्रश्न उद्भवत नाही. तसेच हे डबे दररोज रिकामे करण्यासाठी सफाई कामगार या ठिकाणी नियमित कार्यरत असेल, असे घनकचरा व्यवस्थापन खात्यातील एका अधिकाºयाने सांगितले. फेब्रुवारी २०१९ मध्ये गिरगाव चौपाटी येथे मफतलाल क्लब आणि चित्ता गेट-फोर्ट अशा दोन ठिकाणी भूमिगत कचºयाचे डबे बसविण्यात आले. या प्रयोगाला स्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिल्यामुळे आता हा प्रयोग संपूर्ण मंंबईभर राबविण्यात येईल.

जागा शोधण्याची सूचना
च्मुंबईत भूमिगत विविध वाहिन्या तसेच केबल्सचे मोठे जाळे असल्याने भूमिगत कचºयाच्या डब्यांसाठी जागा शोधण्यात अडचणी येत आहेत. तरीही भरून वाहणाºया कचराकुंड्या व दुर्गंधीची समस्या सोडविण्यासाठी सर्व विभाग कार्यालयांना आपापल्या विभागांत जागा शोधण्याची सूचना घनकचरा व्यवस्थापन खात्याने केली आहे.

अशी आहे भूमिगत कचरापेट्यांची रचना
च्जमिनीत खड्डा खोदून त्यात कचरापेट्या बसविल्या जातील. जमिनीच्या वरच्या भागात कचरा टाकण्यासाठीची चौकोनी जागा असेल. नागरिकांना या चौकोनी जागेच्या आतच कचरा टाकावा लागणार आहे. परिसरातची स्वच्छता राखण्यासाठी आजूबाजूला कचरा टाकू नये, असे आवाहनही करण्यात येत आहे.
च्उघड्यावर असलेल्या कचराकुंड्या अनेकवेळा भरून वाहत असतात. त्यामुळे परिसरात दुर्गंधी पसरते. अशा कचरापेट्या भविष्यात बंद करण्यात येतील. तोपर्यंत या भूमिगत डब्यांमध्ये रिकाम्या करण्यात येतील. कचºयाच्या ट्रकला असलेल्या हायड्रॉलिक जॅकने हा डबा कचºयाच्या वाहनामध्ये रिकामा करून पुन्हा जमिनीखाली बसविण्यात येईल.
च्वरून टाकण्यात येणारा कचरा जमिनीखालच्या डब्यात जाणार असल्याने तो नजरेस पडणार नाही; शिवाय जमिनीवरील भागात कचरा साचणार नसल्याने परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण होणार नाही.
च्मुंबईतील प्रत्येक विभागात किमान दोन ठिकाणी भूमिगत कचºयाचे डबे बसविण्यासाठी ४४ डबे घेण्यात येणार आहेत.
च्१० चौरस मीटर जागेत बसविण्यात येणाºया या भूमिगत डब्यात ओला व सुका कचरा टाकण्यासाठी स्वतंत्र कप्पे तयार करण्यात येतील. अशा प्रकारच्या एका डब्याची किंमत ८ लाख रुपये आहे.

Web Title: The underground garbage will change Mumbai!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.