{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}मुंबईतील भायखळा येथील तस्लिमा हाईट बिल्डिंगच्या मागील बाजुस असलेल्या क्ले रोड, मदनपुरा येथील एका गोदामाला बुधवारी रात्री पावणे आठच्या सुमारास आग लागल्याची घटना घडली. आगीची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ आग शमविण्याचे काम सुरु केले आहे. शिवाय घटनास्थळी पोलीस, बेस्ट आणि १०८ क्रमांकाची रुग्णवाहिकादेखील तैनात करण्यात आली आहे.
आगीत जीवीतहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण लाखो रुपयांचं नुकसान झाल्याची शक्यता आहे. आगीचं कारण देखील अद्याप कळू शकलेलं नाही.