Join us  

मी घरात बसून सगळीकडे जातोय, अख्खं राज्य कव्हर करतोय; उद्धव ठाकरेंनी विरोधकांना सुनावलं

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2020 9:02 AM

Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut: फिरणं आवश्यक आहे, मी नाही म्हणत नाहीये, पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात, तुम्ही एकाच ठिकाणी जाता, पण तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सगळीकडे जाता.

ठळक मुद्देमग तुम्ही विमानाने कशाला जाता? बैलगाडीतून का जात नाही?तंत्रज्ञानाचा उपयोग करणार नसाल तर मग त्या तंत्रज्ञानाचा शोध लावता कशाला?नियमांचे पालन जर मी केले नाही तर जनता का करेल?

मुंबई – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे राज्याचा कारभार घरातून करत आहेत, ऑन फिल्ड येत नाहीत असा आरोप विरोधकांकडून सातत्याने केला जात आहे, यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुलाखतीत प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊतांनी प्रशासन उत्तम काम करतंय, या काळात सहा महिन्यात तुम्ही मंत्रालयात कमीत कमी वेळा गेलात असा आरोप केला जातोय असा प्रश्न विचारला होता.

त्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले, मंत्रालय आता बंद आहे, त्याठिकाणी कमीतकमी गेलो असा जो आरोप होतोय त्यात काही दम नाही, मी माझी भूमिका विस्ताराने सांगतो, आता तंत्रज्ञान एवढं प्रगत झालेले आहे, त्या तंत्रज्ञानाचा उपयोग करु शकणार नसाल तर तुमच्यासारखे दुर्भागी तुम्हीच, आता तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण कितीतरी काम करतोय, व्हिडीओ कॉन्फन्सिंगद्वारे अनेकांची चर्चा करतोय, आमदारांशी चर्चा होतेय, म्हणजे मी घरात बसून सगळीकडे जाऊ शकतो, हा तंत्रज्ञानाचा फायदा आहे, एकाच वेळी संपूर्ण राज्य कव्हर करतोय आणि ताबडतोब निर्णय घेतोय असं त्यांनी सांगितले. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)

तसेच फिरणं आवश्यक आहे, मी नाही म्हणत नाहीये, पण जेव्हा तुम्ही फिरता तेव्हा तुम्हाला मर्यादा येतात, तुम्ही एकाच ठिकाणी जाता, पण तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगचा उपयोग करता तेव्हा तुम्ही सगळीकडे जाता. प्रवासाचा वेळ वाचतो. माझ्यावर जे आरोप करताहेत त्यांना माझा सवाल आहे, मग तुम्ही विमानाने कशाला जाता? बैलगाडीतून का जात नाही? बैलगाडीतून जा, पायी जा, तंत्रज्ञानाचा उपयोग करणार नसाल तर मग त्या तंत्रज्ञानाचा शोध लावता कशाला? असा सवाल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी विरोधकांना विचारला आहे.

...म्हणून डोक्यावरचे केस गेलेले दिसताहेत; उद्धव ठाकरेंनी सांगितलं खरं कारण

दरम्यान, सभा समारंभांना तर बंदीच आहे, जनतेला सभेसाठी बोलावणं म्हणजे आपला नियम आपणचं तोडणं आहे, मुलाखतीदरम्यान आपण सुरक्षित अंतरावर बसलो आहे तसं शक्य होणार आहे का? मी मुख्यमंत्री आहे, माझी सुरक्षा यंत्रणा आहे, माझ्याजवळ कुणी येणार नाही, पण माझ्यासमोर जनता आहे, तिचं काय? ती दाटीवाटीनं बसली तर काय? मी संवाद साधेन पण जनता आजारी पडली तर त्या संवादाचा उपयोग काय? नियमांचे पालन जर मी केले नाही तर जनता का करेल असंही मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सांगितले. (Uddhav Thackeray Interview With Sanjay Raut)

पाहा व्हिडीओ

टॅग्स :उद्धव ठाकरेतंत्रज्ञानकोरोना वायरस बातम्यामंत्रालयसंजय राऊत