Uddhav Thackeray slams P. Chidambaram over INX Media case | चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका
चिदंबरम यांचे अध:पतन हा काळाने उगवलेला सूड, सामनातून टीका

ठळक मुद्देशिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे.चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते.'

मुंबई -  'आयएनएक्स मीडिया' कंपनीत सात वर्षांपूर्वी 305 कोटी रुपयांच्या परकीय गुंतवणुकीस परवानगी देताना झालेल्या कथित भ्रष्ट व्यवहारांच्या आरोपांवरून अटक झालेले माजी केंद्रीय वित्तमंत्री पी. चिदंबरम यांना 26 ऑगस्टपर्यंत सीबीआयच्या कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सामनाच्या अग्रलेखातून पी. चिदंबरम यांच्यावर टीका केली आहे. चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

'हिंदू दहशतवाद' या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विकृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठाकूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे असं देखील अग्रलेखात म्हटलं आहे. चिदंबरम हे 72 तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत. तसेच 3500 कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया व्यवहारात 305 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त 4.6 कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक 305 कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय, ते चिदंबरम आणि त्यांचे दिवटे चिरंजीव कार्ती यांनाच माहीत असं सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे.

सामनाचा आजचा अग्रलेख

- पी. चिदंबरम यांना अखेर अटक झाली आहे. त्यांच्या अटकेच्या निमित्ताने दिल्लीत जे नाटय़ ‘सीबीआय’ने घडवले त्याची खरेच आवश्यकता होती का? एका आर्थिक घोटाळ्यात चिदंबरम यांना अंतरिम जामीन दिल्ली उच्च न्यायालयाने नाकारला. सर्वोच्च न्यायालयाने जामिनावर तत्काळ सुनावणी करण्यास नकार दिला. त्यानंतर उच्च न्यायालयाच्या आवारातून चिदंबरम अदृश्य झाले ते 72 तासांनंतर काँग्रेस मुख्यालयात प्रकट झाले. आपण निर्दोष असल्याचा दावा त्यांनी पत्रकार परिषदेत केला. 

- चिदंबरम तेथून स्वतः च्या घरी पोहोचले व सीबीआयने त्यांच्या अटकेसाठी जे नाट्य केले ते संपूर्ण देशाने पाहिले. चिदंबरम हे 72 तास दिल्लीतच होते, पण सीबीआय त्यांना शोधू शकली नाही. ज्या तपासयंत्रणा चिदंबरमसारख्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीला शोधू शकल्या नाहीत त्या यंत्रणा गुन्हेगार पिंवा अतिरेक्यांचा कसा शोध घेणार, हा प्रश्न विचारला जाऊ शकतो. 

- 72 तासांत चिदंबरम कोठे होते, हे पोलीस पिंवा इतर तपासयंत्रणा शोधू शकत नसतील तर ते त्यांचे अपयश म्हणावे लागेल. चिदंबरम हे काँग्रेसचे नेते आहेत. चिदंबरम देशाचे माजी गृहमंत्री आणि अर्थमंत्री आहेत. असतील हो, पण त्याचा इथे काय संबंध? ते कोणीही असतील, पण कायद्याच्या वर नाहीत.

- 3500 कोटी रुपयांचा एअरसेल मॅक्सिस करार आणि आयएनएक्स मीडिया व्यवहारात 305 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीत गैरव्यवहार झाल्याचे हे प्रकरण आहे. नियमबाह्य गोष्टी या व्यवहारात झाल्याचे उघड दिसत आहे. फक्त 4.6 कोटी रुपयांची परवानगी असताना परकीय गुंतवणूक 305 कोटींपर्यंत पोहोचली हे गौडबंगाल काय, ते चिदंबरम आणि त्यांचे दिवटे चिरंजीव कार्ती यांनाच माहीत. 

- काँग्रेस मुख्यालयात प्रकट झालेल्या चिदंबरम यांनी सांगितले, ‘आयएनएक्स घोटाळ्यात मी आरोपी नाही.’ चिदंबरम यांचे हे म्हणणे असेल तर गेले सहा महिने ते ‘जामीन’ घेऊन का वावरत होते व आरोपी नसताना अटक करून न्यायला तपासयंत्रणांना वेड लागले आहे काय? ‘‘स्वातंत्र्य हा लोकशाहीचा मूलमंत्र आहे. अशा वेळी जीवन आणि स्वातंत्र्य यापैकी मला काही निवडण्यास सांगितल्यास मी स्वातंत्र्याला प्राधान्य देईन,’’ असे वक्तव्य चिदंबरम यांनी काँग्रेस मुख्यालयात केले. 

- चिदंबरम हे कोणत्या स्वातंत्र्याची भाषा करीत आहेत? ‘आयएनएक्स’ व ‘एअरसेल’ व्यवहार म्हणजे ‘मिठाचा सत्याग्रह’ किंवा ‘गांधींची दांडीयात्रा’ नव्हे. हा काही स्वातंत्र्यसंग्राम नाही. त्यामुळे या प्रकरणास नैतिकता व लोकशाही मूल्यांचा मुलामा देण्याची गरज नाही. 

- चिदंबरम गृहमंत्री असताना अनेक राजकीय कार्यकर्त्यांचे स्वातंत्र्य याच पद्धतीने हिरावून घेतले होते व त्यासाठी सीबीआयसारख्या संस्थांचा वापर झालाच होता. ‘हिंदू दहशतवाद’ या शब्दाचे जनक तत्कालीन गृहमंत्री चिदंबरमच होते व त्या विपृत कल्पनेचा त्यावेळी बळी ठरलेले अमित शहा, नरेंद्र मोदी हे आज दिल्लीचे सूत्रधार आहेत. प्रज्ञासिंह ठापूर संसदेत पोहोचल्या आहेत. हा काळाने घेतलेला सूड आहे. 

- चिदंबरम मात्र त्याच ‘सी.बी.आय.’च्या कोठडीत पोहोचले. चिदंबरम हे निष्णात वकील आहेत. राजशकट कसे चालते व हलते याचा अनुभव त्यांना आहे. आहे त्या परिस्थितीस सामोरे जाणे व स्वतःचा बचाव करीत राहणे हाच उपाय आहे. काँग्रेसचा क्षीण झालेला आवाज काही दिवसांत मूक होईल. लोक चिदंबरम यांना विसरून जातील.


 

Web Title: Uddhav Thackeray slams P. Chidambaram over INX Media case

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.