Join us
Daily Top 2Weekly Top 5

उद्धव ठाकरे सगळी समीकरणं जुळवत आहेत, संजय राऊतांकडून युतीचे संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2019 14:27 IST

शिवसेना खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांनी मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

मुंबई - शिवसेना खासदार आणि महत्त्वाच्या नेत्यांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीनंतर खासदार संजय राऊत यांनी पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी बोलताना, आगामी लोकसभा निवडणुकीची रणनीती आणि समीकरणं शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ठरवत आहेत. लोकसभेची गणितं आणि समीकरणं जुळत आहेत, असे म्हणत राऊत यांनी आगामी युतीचे संकेतच दिले आहेत. राऊत यांच्या या विधानानंतर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

शिवसेना खासदारांची मातोश्रीवर बैठक झाली. या बैठकीला जदयुचे नेते आणि राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर हेही उपस्थित होते. या बैठकीत भाजपाकडून मध्यस्थीसाठी प्रशांत किशोर आले होते, असे राऊत यांनी विचारले. त्यावर, प्रशांत किशोर हे घटकपक्षातील महत्त्वाचे सदस्य आहेत, जदयूचे नेते आहेत. त्यामुळे त्यांची ही केवळ सदिच्छा भेट होती, असे राऊत यांनी स्पष्ट केले. 

राऊत यांच्या पत्रकार परिषदेतील महत्त्वाचे मुद्देप्रचाराची धुरा उद्धव ठाकरे यांच्याच हाती... युतीची चर्चा आप लोग कर रहे हो... महाराष्ट्र मे हमेशा शिवसेना ने बडे भाई की भूमिका अदा की हैआप सब न चहा तो हिंदुस्थान की राजनीती मे भी बडी भूमिकाप्रशांत किशोर जेडीयू के राष्ट्रीय उपाध्यक्ष एनडीए के सदस्यबाते बहोत होती है धीरे धीरे आपको पता चलेगाशिवसेना स्ट्रॅटेजी पर चलती है... आधी बाळासाहेब, आता उद्धव ठाकरे हा काय व्यापार नाही मध्यस्थीची गरज नाहीउद्धव ठाकरे पुरेसे आहेत.. . वेट अँड वॉचशिवसेनेचा मुख्यमंत्री जनता ठरवेल. देशाचा पंतप्रधान शिवसेना ठरवेल. शिवसेना उद्धव ठाकरेंच्या आदेशानुसार कामाला लागली आहे. 

 

टॅग्स :संजय राऊतशिवसेनाउद्धव ठाकरे