उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही, एक नंबरचे विश्वासघातकी; बावनकुळेंची घणाघाती टीका
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 4, 2023 17:32 IST2023-04-04T17:30:25+5:302023-04-04T17:32:05+5:30
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.

उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही, एक नंबरचे विश्वासघातकी; बावनकुळेंची घणाघाती टीका
मुंबई-
ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला कार्यकर्त्याला झालेल्या मारहाणी प्रकरणी बोलत असताना उद्धव ठाकरेंनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली. या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरे हे एक नंबरचे विश्वासघातकी नेते असल्याचं म्हटलं आहे. तसंच उद्धव ठाकरेंमध्ये बाळासाहेबांचा एकही गुण नाही. ते जर यापुढे अशाच पद्धतीनं आमच्या नेत्यांना बोलणार असतील तर आम्ही सोडणार नाही, असा इशाराच बावनकुळे यांनी दिला आहे.
...तर उद्धव ठाकरेंना घराबाहेर पडू देणार नाही, चंद्रशेखर बावनकुळेंचा थेट इशारा
उद्धव ठाकरेंनी मर्यादा सोडली तर आम्हीही ऐकणार नाही. तुम्ही आमच्या नेत्यांना बोलणार असाल तर आम्ही सोडणार नाही. आज तुम्हाला शेवटची वॉर्निंग देत आहे. यापुढे फडणवीसांबाबत काही बोललात तर तुम्हाला घराबाहेरही पडू देणार नाही, असंही फडणवीस म्हणाले.
बाळासाहेबांचा एकही गुण नाही
"देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंना भावापेक्षा जास्त प्रेम दिलं. उद्धव ठाकरे फडणवीसांबद्दल असं बोलू शकतात असं कधीच वाटलं नव्हतं. हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरेंसमोर आम्ही कुणीच नाही. पण इतक्या मोठ्या नेत्याचा एकही गुण उद्धव ठाकरेंमध्ये नाही. उद्धव ठाकरे प्रचंड विश्वासघातकी माणूस निघाले. फडणवीसांनी आजवर कधीच उद्धव ठाकरेंवर इतकी व्यक्तिगत टीका केली नाही", असं बावनकुळे म्हणाले.