मुंबई मनपात उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकर यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी, गटनेतेपदी निवड

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2026 15:34 IST2026-01-21T15:33:58+5:302026-01-21T15:34:48+5:30

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला कडवं आव्हान देत उद्धवसेनेने ६५ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानंतर ...

Uddhav Thackeray entrusts big responsibility to Kishori Pednekar in Mumbai Municipal Corporation, selects her as group leader |  मुंबई मनपात उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकर यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी, गटनेतेपदी निवड

 मुंबई मनपात उद्धव ठाकरेंनी किशोरी पेडणेकर यांच्याकडे सोपवली मोठी जबाबदारी, गटनेतेपदी निवड

मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत भाजपा आणि शिंदेसेनेच्या महायुतीला कडवं आव्हान देत उद्धवसेनेने ६५ जागांवर दणदणीत विजय मिळवला होता. या विजयानंतर उद्धवसेनेने महापौर आणि इतर पदांच्या निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज उद्धवसेनेच्या निवडून आलेल्या सर्व नगरसेवकांनी आज आपल्या गटाची नोंदणी केली आहे. तसेच पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांची मुंबई महानगरपालिकेतील उद्धवसेनेच्या गटनेतेपदी निवड करण्यात आली आहे.

या निवडीनंतर प्रसारमाध्यमांशी बोतलाना किशोरी पेडणेकर यांनी सांगितले की, मुंबईच्या महापौरपदाबाबत उद्धव ठाकरे जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असेल. तसेच महापौरपदासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत, असेही त्यांनी सांगितले. 

आमच्यावर कायम संकटं येत राहिली आहेत. पण त्या संकटांना सामोरे जायला आम्ही तयार आहोत. तसेच सभागृहात विरोधकांची पॉवर दाखवण्यापेक्षा मुंबईच्या भल्या करिता जे काही करता येईल, ते आम्ही करू, असेही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

Web Title : उद्धव ठाकरे ने किशोरी पेडणेकर को सौंपी जिम्मेदारी, बनीं समूह नेता

Web Summary : मुंबई नगर निगम चुनाव में उद्धव सेना ने 65 सीटें जीतीं। किशोरी पेडणेकर समूह नेता बनीं। उन्होंने उद्धव ठाकरे के महापौर पद के फैसले का समर्थन किया और विधानसभा में राजनीतिक शक्ति प्रदर्शन के बजाय मुंबई के कल्याण को प्राथमिकता देने का संकल्प लिया।

Web Title : Uddhav Thackeray Entrusts Responsibility to Kishori Pednekar, Appointed Group Leader

Web Summary : Uddhav Sena secured 65 seats in Mumbai's municipal elections. Kishori Pednekar is now group leader. She affirmed support for Uddhav Thackeray's mayoral decision and pledged to prioritize Mumbai's welfare over political power displays in the assembly.