उद्धव सेनेचा दहिसर येथील आर उत्तर महानगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा

By मनोहर कुंभेजकर | Updated: April 23, 2025 01:35 IST2025-04-23T01:34:20+5:302025-04-23T01:35:12+5:30

सदर मोर्चाचे आयोजन विभागप्रमुख उदेश पाटेकर व विभागसंघटक शुभदा शिंदे यांनी केले होते. यावेळी उद्धव सेनेने आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनिश वेंगुर्लेकर यांना निवेदन दिले...

Uddhav Sena's protest at R Uttar Municipal Corporation office in Dahisar | उद्धव सेनेचा दहिसर येथील आर उत्तर महानगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा

उद्धव सेनेचा दहिसर येथील आर उत्तर महानगरपालिका कार्यालयावर हंडा मोर्चा

मुंबई-उद्धव सेनेने दहिसर येथील आर उत्तर महानगरपालिका कार्यालयावर आज दुपारी विभाग क्रमांक १ च्या वतीने शिवसेना उपनेते व माजी आमदार डॉ.विनोद घोसाळकर यांच्या नेतृत्वाखाली "हंडा मोर्चा"काढण्यात आला होता. सदर मोर्चाचे आयोजन विभागप्रमुख उदेश पाटेकर व विभागसंघटक शुभदा शिंदे यांनी केले होते.यावेळी उद्धव सेनेने आर उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त नवनिश वेंगुर्लेकर यांना निवेदन दिले.

शिवसेना नेते, युवासेनाप्रमुख,आमदार आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार मुंबईकरांना भेडसावणारा पाण्याचा तुटवडा व अशुद्ध पाणी तसेच मुंबईकरांना लागू होणारा प्रस्तावित कचरा कर, रस्त्यांची अपूर्ण कामे, नालेसफाई मधील दिरंगाई, ठिकठिकाणी दिसणारे कचऱ्याचे ढीग या प्रश्नावर मुंबई महानगरपालिकेला जाब विचारण्यासाठी हा मोर्चा काढण्यात आला

याप्रसंगी मार्गदर्शन करताना  विनोद घोसाळकर म्हणाले की, उद्धव सेनेच्या आंदोलनामुळे नुकतेच भगवती रुग्णालयाचे खाजगीकरण महापालिकेने रद्द करून आता ते महापालिकेनेच चालवण्याचा निर्णय घेतला आहे, यामुळे जनतेच्या प्रश्नांसाठी आता उद्धव सेना रस्त्यावर उतरल्यावर नक्कीच यश मिळते हे सिद्ध झालं आहे.

पश्चिम उपनगरामध्ये जलबोगद्यातून पाणीपुरवठा होत असूनही सध्या उभ्या राहत असणाऱ्या  टोलेजंग इमारतीमुळे बैठ्या चाळी व झोपडपट्टीवासियाना मुबलक परंपरा प्रमाणात पाणीपुरवठा होत नाही.त्यामुळे अधिकाऱ्यांनी पाण्याचे नियोजन व्यवस्थितपणे करावे असे आवाहन घोसाळकर यांनी केले.

नालेसफाईची कामे अत्यंत संथ गतीने सुरू असून पावसाळ्यापर्यंत नालेसफाई पूर्ण न झाल्यास दहिसर नदीलगतच्या अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरून रहिवाशांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. यास्तव नालेसफाई शंभर टक्के पूर्ण करावी असा इशारा त्यांनी दिला. 

दहिसर मध्ये ९१ ठिकाणी रस्त्यांची कामे सुरू असून ही सर्व कामे दि,३१ मे पूर्वी पूर्ण करावीत तसेच या कामांच्या दर्जाची आयआयटी मार्फत तपासणी करावी अशा सूचना यावेळी पालिका प्रशासनाला दिक्या.

दहिसर मध्ये कचऱ्याचे ढिगारे दिसत असूनही महानगरपालिका जिझिया कराप्रमाणे  कचऱ्यावर कर लावत आहे हा कर रद्द करावा असे आवाहन यावेळी केले.. 

याप्रसंगी माजी नगरसेवक हर्षद कारकर, योगेश भोईर, सुजाता पाटेकर, विधानसभाप्रमुख बाळकृष्ण ढमाले, अशोक म्हामुणकर, उपविभागप्रमुख विनायक सामंत,उदय सुर्वे, सचिन शिर्के, संजय ढोलम, उपविभाग संघटक दीक्षा कारकर , दिपा चुरी, अमिता सावंत ,रोशनी गायकवाड, सोनाली विचारे तसेच सर्व पुरुष व महिला विधानसभा संघटक, समन्वयक, शाखाप्रमुख,शाखा संघटक व शिवसैनिक तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Web Title: Uddhav Sena's protest at R Uttar Municipal Corporation office in Dahisar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.