Join us

उद्धवसेनेची कुंडली आज कोण मांडणार? उत्सुकता! निर्धार शिबिरात आदित्य ठाकरेंचे भाषण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 9, 2025 06:42 IST

'मुंबईच्या समस्या' या विषयावर आदित्य ठाकरे बोलणार आहेत.

मुंबई : उद्धवसेनचे पहिले शिबीर रविवारी मुलुंड येथील कालिदास नाट्यगृहात होणार आहे. युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हस्ते त्याचे उद्घाटन, तर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भाषणाने त्याचा समारोप होईल. विविध विषयांवर नेते, उपनेते मते मांडणार आहेत. मात्र, 'उद्धवेसेनेची कुंडली' या विषयावर कोणते ज्योतिषी भविष्य वर्तविणार हे गुलदस्त्यात ठेवले आहे. 'मुंबईच्या समस्या' या विषयावर आदित्य ठाकरे बोलणार आहेत.

ते ज्योतिषी कोण आहेत? 

निर्धार शिबीराबाबत उद्धवसेनेने प्रसिद्धिपत्रक काढले आहे. त्यात विषय आणि संबंधित विषयावर बोलणाऱ्या नेत्यांची नावे दिली आहेत. मात्र, 'उद्धवसेनेची कुंडली' या विषयासमोर 'ज्योतिषी' असा उल्लेख आहे. पण, ज्योतिषी कोण, हे मात्र जाहीर केलेले नाही. त्यामुळे उत्सुकता वाढली आहे.

कोण, कशावर बोलणार?

'आम्ही उद्धवसेनेत का?' यावर नेते दिवाकर रावते आणि अनंत गीते भूमिका मांडतील. मनसेमधून उद्धवसेनेत आलेले वसंत मोरे, किरण काळे हे 'मी शिवसेनेत का आलो?' हे सांगतील. 'आम्ही मुंबई कोकणात असे घडलो' यावर नेते भास्कर जाधव आणि 'शिवसेनाप्रमुखांना अभिप्रेतशिवसैनिक' या विषयावर नेते संजय राऊत बोलणार आहेत. 

टॅग्स :उद्धव ठाकरेआदित्य ठाकरेसंजय राऊत