थोडक्यात तीन बातम्या

By Admin | Updated: August 31, 2015 00:22 IST2015-08-31T00:22:54+5:302015-08-31T00:22:54+5:30

कुंटणखान्यावर छापा

Typically three news | थोडक्यात तीन बातम्या

थोडक्यात तीन बातम्या

ंटणखान्यावर छापा
मुंबई : ग्रँटरोड परिसरात शुक्रवारी रात्री एका कुटंणखान्यावर छापा घालत पोलिसांनी दोन महिलांची सुटका केली. कामाच्या निमित्ताने मुंबईत आणलेल्या या महिलांकडून वेश्या व्यवसाय करुन घेतला जात होता, अशी माहिती डी.बी. मार्ग पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी शुक्रवारी रात्री येथे छापा घातला. शिवाय महिलांची सुटका केली आणि कुटंणखाना चालकाविरोधात गुन्हा दाखल केला.
..........
कंटेनरच्या धडकेत दोघांचा मृत्यू
मुंबई : रस्ता पार करत असलेल्या दोन पादर्‍यांचा कंटेनरच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी रात्री काळाचौकी परिसरात घडली. यामध्ये एका ३० वर्षीय तरुणासह एका महिलेचाही समावेश आहे. दोघांचीही अद्याप ओळख पटलेली नाही. याबाबत काळाचौकी पोलिसांनी गुन्हा दाखल करत कंटेनर चालकाला अटक केली आहे.
..........
अनधिकृत पाकींग
मुंबई : चेंबूरच्या व्ही.एन. पुरव मार्गावर मोठ्या प्रमाणावर अनधिकृत पार्कींग होते आहे. या परिसरात काही जुन्या कार विकणारे वाहन व्यापारी रस्त्यालगतच आपली वाहने विक्रीसाठी उभी करत आहेत. त्यामुळे या परिसरात मोठया प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. वाहतूक पोलिसांकडून याबाबत कारवाई होत नसल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.

Web Title: Typically three news