दादर रेल्वे स्थानकाबाहेरील पार्किंगमध्ये आज रात्रीच्या सुमारात भीषण आग लागली. प्लॅटफॉर्म नंबर १४ च्या बाहेरील भिंतीबाहेर ही घटना घडली. यामध्ये १०-१२ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत.
अग्निशामक यंत्राच्या मदतीने आग विझविण्यात आली. गजबजलेल्या दादर रेल्वे स्थानकाबाहेर आगीचे लोळ उठल्याने मोठी खळबळ उडाली होती.