एकाची मागणी असताना दोन सिमकार्ड ॲक्टिव्हेट; सायबर भामट्याला विक्री, एका आरोपीला अटक 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 12:33 IST2026-03-17T12:33:42+5:302026-03-17T12:33:42+5:30

धक्कादायक बाब म्हणजे एका सीमकार्डची मागणी केली असतानाही दोन सीमकार्ड ॲक्टिव्हेट करून दुसरे सीमकार्ड सायबर भामट्याना विक्री केले जात होते. 

Two SIM cards activated when one was in demand Sold to cyber crook, one accused arrested | एकाची मागणी असताना दोन सिमकार्ड ॲक्टिव्हेट; सायबर भामट्याला विक्री, एका आरोपीला अटक 

एकाची मागणी असताना दोन सिमकार्ड ॲक्टिव्हेट; सायबर भामट्याला विक्री, एका आरोपीला अटक 

मुंबई  : बनावट पत्त्यांच्या आधारे मोठ्या प्रमाणावर मोबाइल सीमकार्ड ॲक्टिव्हेट करून ती सायबर गुन्हेगारांना पुरविल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.   याप्रकरणी सायबर पोलिस ठाणे, मध्य विभागाने एका संशयिताला ताब्यात घेतले आहे. या सीमकार्डचा वापर ऑनलाइन फसवणुकीसाठी करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.  धक्कादायक बाब म्हणजे एका सीमकार्डची मागणी केली असतानाही दोन सीमकार्ड ॲक्टिव्हेट करून दुसरे सीमकार्ड सायबर भामट्याना विक्री केले जात होते. 

वरळीतील  सायबर पोलिस ठाणे (मध्य विभाग) येथे १० जुलै २०२५ रोजी दूरसंचार विभागाच्या (डीओटी) एआय व डीआययू विंगकडून ई-मेलद्वारे माहिती प्राप्त झाली होती. या विश्लेषणात काही मोबाइल क्रमांक दक्षिण-पूर्व भागातील देशांमध्ये रोमिंगवर वापरले जात असल्याचे आढळून आले. त्यानंतर संबंधित क्रमांक री-व्हेरिफिकेशनसाठी डिस्कनेक्ट करण्यात आले. 

तपासात मुंबई पोलिसांच्या हद्दीतील १२ ‘पॉइंट ऑफ सेल’ (पीओएस) संदर्भातील माहितीही समोर आली. या माहितीच्या आधारे पोलिसांनी तपास सुरू केला असता मुंब्राच्या मोहम्मद सुलतान मोहम्मद हनिफ अन्सारी (४२) याचा शोध घेण्यात आला. 

नागपाडा परिसरातून त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. चौकशीत त्याने उत्तर प्रदेश व बिहारमधील अनेक व्यक्तींची आधारकार्डची माहिती घेऊन त्यांना मुंबईतील बनावट स्थानिक पत्त्यांवर सीमकार्ड सुरू करून दिल्याची कबुली दिली. त्यानुसार त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे.

९० हजारांचे व्यवहार -
ग्राहकांनी एका सीमकार्डची मागणी केली असतानाही दोन सीमकार्ड ॲक्टिव्हेट करण्यात येत असल्याचेही तपासात समोर आले. त्यापैकी एक सीम ग्राहकाला देऊन दुसरे सीम नागपाड्यातील झिशान कामले याला दिले जात होते. 

अशा प्रकारे १००हून अधिक सीमकार्ड झिशान याला पुरविण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. प्रत्येक सीमकार्डमागे सुमारे ५०० रुपये घेतल्याचेही समोर आले असून, गुगल पेच्या माध्यमातून सुमारे ९० हजार रुपयांचे व्यवहार झाल्याचे आढळले.  

या सीमकार्डचा वापर व्हॉट्सॲप व टेलिग्रामसाठी करून देशभरातील नागरिकांची सायबर फसवणूक करण्यात आल्याची माहिती राष्ट्रीय सायबर क्राइम रिपोर्टिंग पोर्टलवरून  प्राप्त झाली आहे.

Web Title : दो सिम एक्टिवेशन घोटाला उजागर; साइबर धोखाधड़ी के लिए एक गिरफ्तार

Web Summary : मुंबई में फर्जी एक्टिवेशन और साइबर अपराधियों को बिक्री से जुड़े एक सिम कार्ड घोटाले का पर्दाफाश हुआ है। पुलिस ने ऑनलाइन धोखाधड़ी में इस्तेमाल किए गए सिम प्रदान करने के आरोप में एक संदिग्ध को गिरफ्तार किया, जो अनुरोध करने पर दो सिम सक्रिय कर रहा था। 100 से अधिक सिम अवैध उपयोग के लिए बेचे गए।

Web Title : Dual SIM Activation Scam Busted; One Arrested for Cyber Fraud

Web Summary : A SIM card scam involving fraudulent activations and sales to cyber criminals has been exposed in Mumbai. Police arrested one suspect for providing SIMs used in online fraud, activating two SIMs when only one was requested. Over 100 SIMs were sold for illicit use.