मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 31, 2025 17:26 IST2025-10-31T17:23:33+5:302025-10-31T17:26:12+5:30
mumbai airport silver gibbons: कस्टम विभागाने जप्त केलेल्या दोन गिबनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे.

मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
mumbai airport silver gibsons: मुंबईविमानतळावरील कस्टम विभागाने बँकॉकहून आलेल्या प्रवाशाकडून माकडासारखे दिसणारा प्राणी असलेले दोन सिल्वर गिबन जप्त केले. याला हिंदीत लंगूर असेही म्हटले जाते. कस्टम विभागाने जप्त केलेल्या दोन गिबनपैकी एकाचा मृत्यू झाला आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे, कस्टम विभागाने ही कारवाई केली. कस्टम कायदा आणि वन्यजीव कायद्यांतर्गत आरोपीला अटक करण्यात आली आहे.
बॅग तपासणीदरम्यान उघडकीस आला प्रकार
कस्टम अधिकाऱ्याने सांगितले की, प्रवाशाच्या बॅगेची तपासणी करताना त्याना दोन सिल्वर गिबन सापडले. एक गिबन दोन महिन्यांचा आणि दुसरा चार महिन्यांचा होता. ते ट्रॉली बॅगमध्ये टोपलीत ठेवण्यात आले होते. अधिकाऱ्याने स्पष्ट केले की अशा प्राण्यांचा विमान प्रवासादरम्यान मृत्यू होण्याची शक्यता जास्त असते. अधिकाऱ्याने पुढे सांगितले की प्राणी त्यांचा प्रवास पूर्ण करत असले तरीही त्यांच्या प्रजाती मूळ अधिवासाबाहेर जिवंत राहण्याची शक्यता खूप कमी असते.
#WATCH | Based on specific Intelligence, a foreign passenger arriving from Bangkok was detained by officials from the Mumbai Customs at Chhatrapati Shivaji Maharaj International Airport (CSMIA) today. A subsequent search of their checked baggage—a trolley bag—led to the discovery… pic.twitter.com/94bqYZt3kA
— ANI (@ANI) October 30, 2025
जावा बेटावर सिल्वर गिबन आढळतो
सिल्वर गिबन हे एक लहान माकड आहे, जे त्याच्या निळसर-राखाडी रंगाच्या केसांमुळे ओळखले जाते. ही प्रजाती इंडोनेशियातील जावा बेटावर आढळते. आययूसीएनने सिल्व्हर गिबनला धोक्यात असलेल्या प्रजाती म्हणून सूचीबद्ध केले आहे. जंगलात त्यांची संख्या २,५०० पेक्षा कमी असल्याचा अंदाज आहे.
भारतात कसा आला सिल्वर गिबन?
सीमाशुल्क विभागाने अटक केलेल्या परदेशी नागरिकाने सुरुवातीला मलेशियाहून थायलंडला प्रवास केला, त्यानंतर तो भारतात आला. आरोपी प्रवाशाला थायलंडमधील एका सिंडिकेटच्या सदस्याने गिबन असलेली बॅग भारतात पोहोचवण्यासाठी दिली होती. या सिंडिकेटने परदेशी नागरिकाच्या प्रवास कार्यक्रमाची व्यवस्था केली होती. सीमाशुल्क विभागाने आरोपीला अटक केली आहे आणि या प्रकरणाची चौकशी करत आहे.