मुंबई : अवघ्या अर्ध्या तासाच्या फरकाने विक्रोळी आणि घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर झालेल्या अपघातांत दोघांचा बळी गेल्याची घटना सोमवारी घडली. या प्रकरणी विक्रोळी आणि टिळकनगर पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.विक्रोळीत सकाळी ७ वाजता सिग्नल बंद असताना भरधाव वेगात निघालेल्या टेम्पोच्या धडकेत रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. यात सुनील खंडेराव (४८, रा. गोवंडी) यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी विक्रोळी पोलिसांनी टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.दुसऱ्या घटनेत, दुचाकीस्वार बॅरीकेटला धडकल्याने अपघात झाला. माज झुबेर जमादार (१८) हा सकाळी ७.३० च्या सुमारास मित्र रुमान रिझवान जमादार याच्यासोबत दुचाकीने जात होता. दरम्यान, मानखुर्दहून घाटकोपरकडे जाताना भरधाव वेगामुळे माज याचा गाडीवरचा ताबा सुटला आणि दुचाकी मेट्रोच्या बॅरीकेटला धडकली. त्यात माज याचा मृत्यू झाला, तर रुमान हा जखमी झाला आहे.रुमान याच्या वडिलांच्या तक्रारीवरून माज जमादारविरुद्ध टिळकनगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले.
घाटकोपर-मानखुर्द लिंक रोडवर अपघातात दोन जणांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2019 03:24 IST