‘एक्स्प्रेस-वे’वर आणखी दोन बोगदे; आठपदरीसाठी अडीच हजार कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2023 08:58 IST2023-09-23T08:58:17+5:302023-09-23T08:58:35+5:30
एक्सप्रेस-वे हा वेगवान मार्ग असून जुन्या महामार्गावरून मुंबईला जाण्यासाठी चार ते पाच तासांचा प्रवास अवघ्या अडीच ते तीन तासांवर आला आहे

‘एक्स्प्रेस-वे’वर आणखी दोन बोगदे; आठपदरीसाठी अडीच हजार कोटी
पुणे : पुणे-मुंबई ‘एक्स्प्रेस वे’वरील सध्याची वाहनांची वाढती संख्या; तसेच भविष्यात होणारी वाढ लक्षात घेऊन सहापदरी असलेला मार्ग आठपदरी करावा लागणार आहे. त्यासाठी बोरघाटात आणखी दोन बोगदे करण्यात येणार आहेत. हा सुमारे अडीच हजार कोटी रुपयांच्या खर्चाचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठविण्यात आला आहे. हा प्रस्ताव येत्या वर्षाअखेर मंजूर होईल, अशी अपेक्षा राज्य रस्ते विकास महामंडळाला आहे.
मिसिंग लिंक अंतिम टप्प्यात
एक्सप्रेस-वे हा वेगवान मार्ग असून जुन्या महामार्गावरून मुंबईला जाण्यासाठी चार ते पाच तासांचा प्रवास अवघ्या अडीच ते तीन तासांवर आला आहे; मात्र सध्या हा मार्ग सहापदरी आहे. त्यामुळे पुणे-मुंबईकडे ये-जा करताना वाहतूककोंडीला सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे प्रवासाला ३ तासांऐवजी अधिक कालावधी लागत आहे.