जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 17:44 IST2025-08-01T17:40:04+5:302025-08-01T17:44:55+5:30

मुंबईतील जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली.

Two minors drown in Juhu sea; one rescued, search for the other underway | जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

जुहूच्या समुद्रात दोन अल्पवयीन मुले बुडाली; एकाला वाचवलं, दुसऱ्याचा शोध सुरू!

मुंबईतील जुहूच्या समुद्रात पोहोण्यासाठी गेलेली दोन अल्पवयीन मुले बुडाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला यशस्वीरित्या वाचवले. तर, दुसरा मुलगा अजूनही बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. ही घटना गोदरेज गेटजवळील सिल्व्हर बीचवर आज (शुक्रवारी) सकाळी घडली. या घटनेने परिसरात एकच खळबळ माजली आहे. मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुंबईतील जुहूच्या समुद्रात सकाळी ८.३० वाजताच्या सुमारास दोन अल्पवयीन मुले बुडाल्याची माहिती मिळाली. ड्युटीवर असलेल्या जीवरक्षकांनी एकाला वाचवले. मात्र, दूसरा मुलगा लाटेबरोबर समुद्रात खेचला गेला.  घटनेची माहिती मिळताच, मुंबई अग्निशमन दल, स्थानिक पोलीस, बीएमसीच्या के-पश्चिम वॉर्डचे अधिकारी आणि १०८ आपत्कालीन वैद्यकीय सेवा ताबडतोब जुहू समुद्रकिनाऱ्यावर दाखल झाले. मुलाच्या शोधासाठी युद्धपातळीवरील शोधमोहीम सुरू करण्यात आली असून, त्यात गोताखोर, बचाव बोटी आणि समुद्रकिनाऱ्यावर तैनात देखरेख पथके समाविष्ट आहेत.

या दुर्घटनेतील मुलांची ओळख अद्याप सार्वजनिक करण्यात आली नाही. ही मुले स्थानिक रहिवाशी आहेत की, पर्यटनासाठी मुंबईत आली होती? याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती मिळाली नाही. 
 

Web Title: Two minors drown in Juhu sea; one rescued, search for the other underway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.