Join us

मंत्रालयातील दोन अधिकारी निलंबित; महिला अधिकाऱ्याशी गैरवर्तन प्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2022 06:25 IST

मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे.

मुंबई : मंत्रालयातील एका महिला अधिकाऱ्याबाबत अपमानास्पद विधाने करून विनयभंग केल्याप्रकरणी दोन अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. 

मंत्रालयात वरिष्ठ महिला अधिकाऱ्यांचा विनयभंग करणाऱ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची निष्पप चौकशी व्हावी, यासाठी त्यांना तत्काळ कार्यमुक्त करून कठोर कारवाई करा, अशी मागणी विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केली होती. त्यानंतर या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

मंत्रालयात इतर मागास बहुजन कल्याण विभागातील अवर सचिव दर्जाच्या अधिकाऱ्याने उपसंचालक दर्जाच्या महिला अधिकाऱ्यांशी गैरवर्तणूक केल्याचा आरोप आहे. त्याच ठिकाणी याच विभागाचे उपसचिव देखील उपस्थित होते. त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी गोऱ्हे मुख्यमंत्र्यांकडे निवेदनाद्वारे केली होती. या कारवाईचे गोऱ्हे यांनी स्वागत केले असून याबाबत संबंधित विभागाच्या मंत्र्यांनी केवळ घोषणा न करता निलंबित केल्याचे परिपत्रक जारी करावे, अशी मागणी त्यांनी केली आहे.

टॅग्स :मंत्रालयनिलंबन