दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 23, 2018 05:32 IST2018-06-23T05:32:28+5:302018-06-23T05:32:32+5:30
कुर्ला येथे बस मागे घेताना दोन बसच्या मध्ये येऊन शुक्रवारी तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी बेस्ट बसचालक संजय गणपती पवारला अटक केली.

दोन बसमध्ये चिरडून तरुणीचा मृत्यू
मुंबई : कुर्ला येथे बस मागे घेताना दोन बसच्या मध्ये येऊन शुक्रवारी तरुणीचा मृत्यू झाला. या प्रकरणी कुर्ला पोलिसांनी बेस्ट बसचालक संजय गणपती पवारला अटक केली.
अमरीन शेख (२२) असे मृत तरुणीचे नाव असून, ती मालाडची रहिवासी होती. ती वांद्रे - कुर्ला संकुल येथील एका खासगी बँकेत नोकरीला होतीे. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे कामावर जाण्यासाठी कुर्ला रेल्वे स्थानकात ती उतरली. तेथून वांद्रे-कुर्ला संकुल येथे जाण्यासाठी निघाली. त्याच दरम्यान सकाळी ९.३० च्या सुमारास उभी असलेली बेस्ट बस (क्र. २७४२) चालक पवार याने मागे घेतली. मात्र, बसमागे आणखी एक बस होती. दोन्ही बसच्या मधून अमरीन रिक्षा पकडण्यासाठी धावत जात होती. मात्र, ती चिरडली गेली.