Join us

झाडावर आदळून दोघांचा मृत्यू; जुन्या मुंबई-पुणे मार्गावर अपघात 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 9, 2025 10:05 IST

यात एकाच जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. जखमीला पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले, मात्र त्याचाही मृत्यू झाला. 

मोहोपाडा : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चार जुन्या मुंबई-पुणे रस्त्यावर कलोते गावच्या हद्दीत हॉटेलसमोर मोटारसायकलचा भीषण अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला आहे. 

मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारवरून दोन तरुण दुचाकीवरून (क्रमांक एमएच ०३ इपी २८६३ या गाडीने पुणे बाजूला जात असताना कलोते गावच्या हद्दीत हॉटेलजवळ दुचाकी झाडावर आदळून अपघात झाला. अपघात एवढा भीषण होती, की यात गाडीचे तुकडे झाले. यात एकाच जागीच मृत्यू झाला, तर दुसरा तरुण गंभीर जखमी झाला. जखमीला पनवेल येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये तत्काळ दाखल करण्यात आले, मात्र त्याचाही मृत्यू झाला. 

महामार्ग वाहतूक पोलिस, पळस्पे केंद्र येथील कर्मचाऱ्यांनी तातडीने मदतकार्य केले. तत्पूर्वी खोपोलीतील अपघातग्रस्त संस्था व हेल्फ फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांनी अपघातस्थळी जाऊन मदत केली. घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक सचिन पवार यांनी घटनास्थळी धाव घेतली. अद्याप मृतांची ओळख पटलेली नाही. 

टॅग्स :अपघातमृत्यू