संपामुळे आज, उद्या बँका बंद
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2018 10:09 IST2018-05-30T07:29:41+5:302018-05-30T10:09:24+5:30
वेतनवाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील कर्मचारी व अधिकारी बुधवारपासून दोन दिवस देशव्यापी संपावर जात आहेत. त्यामुळे राज्यभरातील ५५०० शाखांमधील कामकाज बंद असेल.

संपामुळे आज, उद्या बँका बंद
मुंबई : वेतनवाढीच्या मागणीसाठी सरकारी बँकांमधील कर्मचारी व अधिकारी बुधवारपासून दोन दिवस देशव्यापी संपावर जात आहेत. त्यामुळे राज्यभरातील ५५०० शाखांमधील कामकाज बंद असेल.
किरकोळ पगारवाढीला आहे विरोध
बँक व्यवस्थापनाने २ टक्के पगारवाढीचा प्रस्ताव कर्मचाऱ्यांसमोर ठेवला आहे. त्याला कर्मचारी युनियनचा विरोध आहे. त्यामुळे नऊ युनियन्सच्या युनायटेड फोरम आॅफ बँक्स युनियनने (यूएफबीयू) या संपाची हाक दिली आहे. संपादरम्यान नेट बँकिंग, एटीएम, मोबाइल बँकिंग आदी सेवा सुरू राहतील. पण प्रत्यक्ष बँकांमधील कामकाज बंद असेल.
कोणकोणत्या बँकांमध्ये संप?
स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय), पंजाब नॅशनल बँक (पीएनबी), बँक ऑफ बडोदा, इलाहाबाद बँक, युनियन बँक, युको बँक सहित सार्वजनिक आणि खासगी क्षेत्रातील सर्व बँकांचे अधिकारी-कर्मचाऱ्यांचा संपामध्ये समावेश आहे. मिळालेल्या माहितीनुसार, काही एटीएमचे सुरक्षा रक्षकदेखील संपामध्ये सहभागी होणार आहेत.
(4 व्यवहारांनंतर गोठताहेत जन-धन खाती)
या अडचणी होऊ शकतात निर्माण
या बँकांमध्ये ज्या ग्राहकांचे खाते आहे, त्यांचा पगार खात्यात येण्यास विलंब होऊ शकते. शिवाय, एटीएम सेवेवरही परिणाम होण्याची शक्यता आहे. तसंच नेट बँकिंग, आरटीजीएस, एनईएफटीच्या सेवादेखील मिळणार नसल्याचे बोलले जात आहे.