Two arrested with makeupman; Three lakh MD seized | मेकअपमनसह दोघांना अटक; तीन लाखांचे एमडी जप्त

मेकअपमनसह दोघांना अटक; तीन लाखांचे एमडी जप्त

मुंबई : एका मेकअपमनसह दोघांना शुक्रवारी अटक करण्यात आली. त्यांच्याकडून सुमारे तीन लाखांचे एमडी जप्त करण्यात आले. अटक आरोपी पूर्वी बॉलीवूडमध्ये कार्यरत असल्याचा पोलिसांचा दावा असून, क्राइम ब्रँचच्या कक्ष ११ ने ही कारवाई केली. बोरीवलीच्या दत्तपाडा रोडवर दोघेजण खिशात काहीतरी लपवून संशयास्पदरीत्या फिरत होते. कक्ष ११ चे प्रमुख सुनील माने यांच्या पथकाने त्यांना ताब्यात घेत झडती घेतली. तेव्हा त्यांच्या खिशात प्लॅस्टिकच्या पिशवीत ठेवलेले जवळपास १०५ ग्रॅम एमडी हा अमली पदार्थ सापडला. त्याची किंमत सुमारे ३ लाख १५ हजार रुपये आहे.

परवेझ उर्फ लड्डू हलाई (३०) आणि निकेतन उर्फ निखिल उर्फ गोलू जाधव अशी अटक आरोपींची नावे आहेत. हलाई याच्याविरोधात कस्तुरबा, चारकोप, बोरीवली, आंबोली, तर जाधवविरोधात डी.एन. नगर पोलिसांत दोन गंभीर गुन्हे दाखल आहेत. हलाईने बॉलीवूड, तसेच विविध रिअ‍ॅलिटी शोमध्ये मेकअपमन म्हणून काम केले आहे. अमली पदार्थ विकून अधिक नफा मिळविण्याच्या नादात त्याने या धंद्यात प्रवेश केल्याचे पोलिसांना सांगितले. दोघांचीही पोलीस कसून चौकशी सुरू आहेत.

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Two arrested with makeupman; Three lakh MD seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.