Join us
Daily Top 2Weekly Top 5

१८० कोटी रुपयांच्या बोगस गुंतवणूकप्रकरणी दोघांना अटक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2026 13:49 IST

दोन्ही आरोपी १८० कोटींचा घोटाळा करून फरार झाले होते. मात्र, दुबईतून नेपाळमार्गे ते भारतात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा माग काढत त्यांना अटक केली. क्यूफॉन ॲपद्वारे त्यांनी गुंतवणूक योजना सादर केली होती. 

मुंबई : ॲपच्या माध्यमातून गुंंतवणूक योजना सादर करत आणि त्यावर अवाजवी परतावा देण्याची घोषणा करत गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या सुधीर कोठाडीया आणि उमंग कोठाडीया या दोन आरोपींना ईडीने गुजरातमधील भरूच येथून अटक केली. दोन्ही आरोपींना न्यायालयात हजर करण्यात आले. त्यांना २० मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आली आहे.

दोन्ही आरोपी १८० कोटींचा घोटाळा करून फरार झाले होते. मात्र, दुबईतून नेपाळमार्गे ते भारतात आल्याची माहिती मिळाल्यानंतर ईडीच्या अधिकाऱ्यांनी त्यांचा माग काढत त्यांना अटक केली. क्यूफॉन ॲपद्वारे त्यांनी गुंतवणूक योजना सादर केली होती. 

महाराष्ट्र आणि गुजरातमधील अनेक लोकांनी यामध्ये पैसे गुंतवले होते. मात्र, पैसे जमा झाल्यानंतर हे दोन्ही आरोपी फरार झाले होते. या प्रकरणी २०२४ यावर्षी ठाणे पोलिसांत गुन्हा दाखल झाला होता; परंतु यामध्ये मनी लॉड्रिंग झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर ईडीने तपास सुरू केला होता.

English
हिंदी सारांश
Web Title : Two Arrested in ₹180 Crore Fake Investment Scam

Web Summary : ED arrested Sudhir and Umang Kothadia from Gujarat for a ₹180 crore investment fraud via a mobile app. The duo, who promised high returns, fled after collecting investments from Maharashtra and Gujarat. They were caught after entering India from Dubai via Nepal. A Thane police case led to the ED investigation.
टॅग्स :गुन्हेगारीपोलिस