तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, सरकारनं सोपवलं वेगळंच 'प्रोजेक्ट'
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2018 18:41 IST2018-12-27T18:30:38+5:302018-12-27T18:41:46+5:30
तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झालेली आहे.

तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली, सरकारनं सोपवलं वेगळंच 'प्रोजेक्ट'
मुंबईः तुकाराम मुंढे यांची पुन्हा एकदा बदली झालेली आहे. तुकाराम मुंढे यांची आता राज्य एड्स नियंत्रण सोसायटीत बदली करण्यात आलेली आहे. मुंढे यांची एड्स नियंत्रण मंडळात प्रकल्प संचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांपूर्वीच मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली होती. तुकाराम मुंढे यांची राज्य सरकारने अवघ्या नऊ महिन्यांत पुन्हा बदली केली आहे. गेल्या 12 वर्षांतील मुंढे यांची ही 13वी बदली आहे. त्यांची 2016 पासूनची ही पाचवी बदली आहे. आधी ते पुणे महानगर परिवहन महामंडळाचे अध्यक्ष, तत्पूर्वी नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त होते आणि त्याही आधी सोलापूरचे जिल्हाधिकारी होते. दरम्यान, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदी मुंढेंची नियुक्ती झाल्याची अफवा सोशल मीडियावर व्हायरल झाली होती. मात्र, ती केवळ अफवाच असून मुंढेंना मंत्रालयातच नियुक्ती देण्यात आली होती.