कांदिवलीत मातीने भरलेला ट्रक उलटला
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2019 15:46 IST2019-03-15T15:45:23+5:302019-03-15T15:46:30+5:30
प्रसंगावधान दाखवत ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला.

कांदिवलीत मातीने भरलेला ट्रक उलटला
ठळक मुद्देपालिकेद्वारे नाला बनविण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यावर लोखंडी पत्रा टाकण्यास आला होता. ही घटना आज सकाळी घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते.
मुंबई - कांदिवली पश्चिमेकडील एकता नगर परिसरात पालिकेने खोदलेल्या खड्ड्यात चाक अडकून मातीने भरलेला ट्रक उलटला आहे. ही घटना आज सकाळी घडली असून पोलीस घटनास्थळी दाखल झाले होते. पालिकेद्वारे नाला बनविण्यासाठी खोदलेल्या खड्ड्यावर लोखंडी पत्रा टाकण्यास आला होता. जेणेकरून रस्त्यावरून गाड्या ये - जा करू शकतील. मात्र, आज सकाळी पालिकेने खोदलेल्या खड्यात पालिकेचाच ट्रक उलटला आहे. प्रसंगावधान दाखवत ट्रक चालकाने ट्रकमधून उडी मारून आपला जीव वाचवला.