२९ पैकी २२ महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश, काय आहे भाजपच्या यशामागचं गुपित?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2026 23:36 IST2026-01-16T22:47:26+5:302026-01-16T23:36:20+5:30

राज्यात महानगरपालिका निवडणुकीत भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने २९ पैकी २५ महानगरपालिकेमध्ये विजय मिळवला.

Tremendous success in 22 out of 29 municipal corporations, what is the secret behind BJP's success? | २९ पैकी २२ महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश, काय आहे भाजपच्या यशामागचं गुपित?

२९ पैकी २२ महानगरपालिकांमध्ये घवघवीत यश, काय आहे भाजपच्या यशामागचं गुपित?

राज्यात २९ महानगरपालिकांसाठी निवडणूक झाली. या निवडणुकीचे निकाल हाती आले, या निकालात भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला. भाजपाने २९ पैकी २५ महानगरपालिकेमध्ये विजय मिळवला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नियोजनामुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपाला यश  मिळाले.  

शहरी मतदारांचा कल ओळखण्याची क्षमता आणि सत्तेच्या माध्यमातून झालेली विकासकामे या जोरावर भाजपने राज्यातील महापालिकांमध्ये विजय मिळवला आहे.

या महानगरपालिकेवर भाजपाची सत्ता

 मुंबई, ठाणे, नवी मुंबई, पनवेल, कल्याण-डोंबिवली, मीरा भाईंदर, उल्हासनगर, नाशिक, अहिल्यानगर, धुळे, जळगाव, पुणे, पिंपरी चिंचवड़, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, इचलकरंजी, छत्रपत संभाजी नगर, जालना, नांदेड़, नागपूर, अकोला

'रवींद्र -देवेंद्र' जोडीने महानगरपालिकांचे मैदान मारले

निवडणुकांचे नियोजन, तिकीट वाटप, सभांचे नियोजन याबरोबरच विरोधी पक्षांना जोखण्याचे कसब “देवेंद्र आणि रविंद्र” या भाजपाच्या जोडीकडे आहे. सरकार आणि भाजपा महाराष्ट्र प्रदेश पक्ष यातील समन्वयाचे हे यश असल्याने हा अभूतपूर्व विजय मिळाल्याचे विश्लेषण राजकीय विश्लेषकांनी केले आहे.

निवडणूक काळात केलेल्या वक्तव्याने, पेहरावाने झालेल्या वैयक्तिक स्वरूपाच्या टीकेमुळे रविंद्र चव्हाण गोंधळले नाहीत. उलट त्यांनी विरोधकांना जनतेसाठी अनावश्यक अशा विषयात गुंतवून ठेवून, भाजपासाठी विजयाची वाट अधिक सुकर केल्याचे स्पष्ट झाले. विरोधकांनी चव्हाण यांच्यावर केलेल्या वैयक्तिक टीकेला जनतेच्या दृष्टीने कवडीमोल किंमत असल्याचेही या निमित्ताने दिसले. २५ वर्षांच्या राजकीय वाटचालीत रविंद्र चव्हाण त्यांच्यावर झालेल्या  प्रत्येक टीकेनंतर एक पाऊल पुढे जातानाच दिसले. 

Web Title : नगर निगम चुनावों में भाजपा की शानदार जीत: क्या है रहस्य?

Web Summary : भाजपा ने नगर निगम चुनावों में शानदार जीत हासिल की, अधिकांश निगमों पर नियंत्रण प्राप्त किया। नेताओं की रणनीतिक योजना और शहरी विकास पर ध्यान केंद्रित करने से यह सफलता मिली। 'रवींद्र-देवेंद्र' की जोड़ी के समन्वय और विपक्ष की गलतियों ने भाजपा की जीत का मार्ग प्रशस्त किया।

Web Title : BJP's Sweeping Victory in Municipal Elections: What's the Secret?

Web Summary : BJP secured a major victory in municipal elections, winning control of most corporations. Strategic planning by leaders and focus on urban development fueled this success. The 'Ravindra-Devendra' duo's coordination and opposition's missteps further paved the way for BJP's triumph.