मुंबईत १२१ ठिकाणी झाडे कोसळली

By ऑनलाइन लोकमत | Published: August 6, 2020 01:00 AM2020-08-06T01:00:39+5:302020-08-06T01:01:08+5:30

सांताक्रूझमधील नाल्यात पडलेली मुलगी बेपत्ताच; शोधकार्य थांबले

Trees fell at 121 places in Mumbai | मुंबईत १२१ ठिकाणी झाडे कोसळली

मुंबईत १२१ ठिकाणी झाडे कोसळली

Next

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात बुधवारी देखील पावसाचा जोर कायम होता. मुंबईत पावसात सलगता नसल्याने फार कमी ठिकाणी पाणी साचल्याच्या घटना घडल्या. पाणी साचण्याचे प्रमाण कमी असले तरी अधून-मधून कोसळत असलेल्या कोसळधारांमुळे मुंबापुरीचा वेग रोजच्या तुलनेत कमी झाला असून, येत्या २४ तासांत मुंबई शहर आणि उपनगरात जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली आहे.
मुंबईत पाऊस कोसळत असतानाच सांताक्रूझ येथे नाल्यात घर पडून झालेल्या दुर्घटनेत ३ मुली आणि १ महिला नाल्यात पडली. आतापर्यंत १ महिला व २ मुलींना बाहेर काढण्यात आले. यातील शिवन्या मिलिंद काकडे या ३ वर्षीय मुलीची प्रकृती स्थिर आहे. तर जान्हवी मिलिंद काकडे (दीड वर्ष) आणि रेखा काकडे (२६) याचा मृत्यू झाला. अग्निशमन दल व राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद पथकामार्फत चौथ्या मुलीचा शोध घेण्यात आला. मात्र रात्री ऊशिरापर्यंत तिचा शोध लागला नाही. त्यामुळे शोधकार्य थांबविण्यात आले. तर बुधवारी सकाळी पाऊस पडत असतानाच पाणी साचल्याने बेस्ट बसची वाहतूक गांधी मार्केट आणि सायन रोड नंबर २४ येथून पर्यायी मार्गाने वळविण्यात आली होती.

शहरात २ ठिकाणी, पूर्व उपनगरात ३ आणि पश्चिम उपनगरात ९ अशा एकूण १४ ठिकाणी घराचा भाग पडला.
शहरात ३५, पूर्व उपनगरात २१ आणि पश्चिम उपनगरात ६५ अशी १२१ ठिकाणी झाडे कोसळली.
शहरात १५, पूर्व उपनगरात १, पश्चिम उपनगरात ८ अशा एकूण २४ ठिकाणी शॉर्टसर्किट झाले.

येथे साचले पाणी
हिंदमाता, वडाळा येथील शेख मिस्री दर्गा रोड, बीपीटी स्काय वॉक, गांधी मार्केट, सायन रोड नंबर २४, चेंबूर येथील पोस्टल कॉलनी, दहिसर सबवे, अंधेरी सबवे, अंधेरी मार्केट येथे पाणी साचले होते. दुपारी साडेबारा वाजेपर्यंत शेख मिस्त्री दर्गा रोड व पोस्टल कॉलनी वगळता इतर सर्व ठिकाणच्या पाण्याचा निचरा झाला होता.
मॉल खुले; पण पावसामुळे रिकामे
अनलॉकनुसार मुंबई शहर
आणि उपनगरातील मॉल ५ आॅगस्टपासून खुले झाले खरे; मात्र जोरदार पावसाने खुल्या झालेल्या मॉलमध्ये तुरळक
गर्दी होती. विशेषत: पावसामुळे मॉलमध्ये काम करणारा कर्मचारीच मॉलपर्यंत पोहचू शकला नाही. परिणामी बहुतांशी मॉलमधील शॉप बंद होते.

Web Title: Trees fell at 121 places in Mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.