प्रवास आजपासून होणार ‘बेस्ट’, सामाजिक अंतर ठेऊन प्रवास

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 07:17 IST2020-06-08T07:16:56+5:302020-06-08T07:17:12+5:30

बेस्टकडून प्राप्त माहितीनुसार, शासनाने आणि मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार, या आदेशामध्ये उल्लेख केलेल्या नागरिकांना ८ जूनपासून बेस्ट बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

Travel will be 'Best' from today | प्रवास आजपासून होणार ‘बेस्ट’, सामाजिक अंतर ठेऊन प्रवास

प्रवास आजपासून होणार ‘बेस्ट’, सामाजिक अंतर ठेऊन प्रवास

मुंबई : मिशन बिगिन अगेनअंतर्गत सोमवारपासून बेस्ट बस आणखी वेगाने धावणार आहे. राज्य शासन आणि मुंबई महापालिकेच्या आदेशानुसार सरकारी, खासगी कार्यालयातील कर्मचारी आणि स्वयंमरोजगार असणाऱ्या व्यक्तींना ओळखपत्र दाखवून सोमवारपासून बेस्ट बसमधून प्रवास करता येणार आहे, अशी माहिती बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे.

बेस्टकडून प्राप्त माहितीनुसार, शासनाने आणि मुंबई महापालिकेने जारी केलेल्या आदेशानुसार, या आदेशामध्ये उल्लेख केलेल्या नागरिकांना ८ जूनपासून बेस्ट बसमध्ये सामाजिक अंतर ठेवून प्रवास करू देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार, बेस्टच्या बसगाड्यांमध्ये डावीकडे आणि उजवीकडे दोन जणांकरिता असणाºया प्रत्येक आसनावर केवळ एक एकच प्रवासी बसून प्रवास करू शकतो. तसेच केवळ पाच प्रवासी उभ्याने प्रवास करतील.
बेस्टचे महाव्यवस्थापक सुरेंद्रकुमार बागडे यांनी लोकमतला यापूर्वीच याबाबतची माहिती दिली होती. तर बेस्ट समितीचे अध्यक्ष अनिल पाटणकर यांनी सांगितले होते की, आम्ही सोमवारी बेस्टमध्ये जाणार आहोत. यावेळी बेस्टच्या महाव्यवस्थापकांसोबत चर्चा करू. त्यांच्याशी संवाद साधू. बेस्टसोबत झालेल्या बैठका, चर्चा यानंतर महापालिकेसोबतही संवाद साधला जाईल. बेस्ट कामगारांच्या सुरक्षेचा विचार करता कामगारांना सॅनिटायजर, मास्क दिले जाते. तसेच कंटेनमेंट झोनमध्ये जे कामगार काम करण्यास जातात; त्यांना किट आणि शिल्ड दिले जात आहे.
मुंबईबाहेरील प्रवाशांसाठी
बसची संख्या
विरार ते मालवणी २०, नालासोपारा ते गोरेगाव १५, नालासोपारा ते पोयसर ५, बदलापूर ते सायन १५, कल्याण ते सायन १५, पनवेल ते सायन १०.

बेस्टकडून बोरीवली, दिंडोशी, खोदादाद सर्कल, ओशिवरा, सांताक्रुझ, सायन, वांद्रे, धारावी, मुलुंड, घाटकोपर, ठाणे, बेलापूर, मालवणी, विक्रोळी, गोरेगाव, बॅकबे आगार, कुलाबा, मंत्रालय, वरळी, वडाळा, मालाड, मागाठाणे, ट्रॉम्बे, मजास, कुर्ला आणि सायन येथूनही बस सोडल्या जाणार आहेत.

Web Title: Travel will be 'Best' from today