राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 30, 2020 23:56 IST2020-09-30T23:54:53+5:302020-09-30T23:56:31+5:30
राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल 150 अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी पोस्टींग देण्यात येत आहे

राज्यात 43 IPS ऑफिसरसह 150 वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
मुंबई - पोलीस खात्यातील तब्बल 150 वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये 43 आयपीएस अधिकाऱ्यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने तसा आदेश जारी केला असून सर्व अधिकाऱ्यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. पोलीस महासंचालक यांच्या आदेशानंतर संबंधित नियंत्रक अधिकारी यांनी कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती विचारात घेऊन उपरोक्त अधिकारी यांना बदलीच्या ठिकाणी हजर होण्याकरिता कार्यमुक्त करावे व त्यानंतर संबंधित अधिकाऱ्यांनी बदलीच्या पदावर रुजू होऊन तसा अहवाल शासनास सादर करावा, असे या आदेशात म्हटले आहे.
राज्य पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या झाल्याने सर्वत्र चर्चा सुरू झाली आहे. विशेष म्हणजे तब्बल 150 अधिकाऱ्यांना नवीन ठिकाणी पोस्टींग देण्यात येत आहे. त्यामध्ये 43 आयपीएस अधिकारी व 107 उपविभागीय पोलीस अधिकारी यांचा समावेश आहे. राज्यपाल यांच्या डिजिटल स्वाक्षरीने याबाबतचा आदेश पारीत करण्यात आला आहे.