Transfer of Ashwini Joshi, Sudhakar Shinde canceled | अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे यांची बदली रद्द

अश्विनी जोशी, सुधाकर शिंदे यांची बदली रद्द

मुंबई : सनदी अधिकारी डॉ. अश्विनी जोशी, डॉ. सुधाकर शिंदे यांची अलिकडेच करण्यात आलेली बदली राज्य शासनाने मंगळवारी रद्द केली. जोशी यांची बदली पेट्रोकेमिकल महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकपदी गेल्या आठवड्यात करण्यात आली होती. 
ती रद्द करण्यात आली असून त्यांच्या नव्या बदलीचा आदेश काढण्यात आलेला नाही. तसेच, डॉ. सुधाकर शिंदे यांची बदली गेल्या आठवड्यात सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव म्हणून करण्यात आली होती. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यास दोन दिवसांतच स्थगिती दिली होती. शिंदे यांची बदली रद्द करण्यात आली असून ते महात्मा फुले जनआरोग्य योजनेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पूर्वीसारखेच काम पाहतील. या शिवाय अन्य चार आयएएस अधिका-यांची राज्य शासनाने मंगळवारी बदली केली.
 

English summary :
Transfer of Ashwini Joshi, Sudhakar Shinde canceled

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: Transfer of Ashwini Joshi, Sudhakar Shinde canceled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.