रेल्वे प्रवास ठरतोय जीवघेणा; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, वर्षभरातील आकडेवारी

By ऑनलाइन लोकमत | Published: January 31, 2020 01:19 AM2020-01-31T01:19:47+5:302020-01-31T01:20:22+5:30

रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात २ हजार १२३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, याच काळात १ हजार ७५८ प्रवासी जखमी झाले.

Train travel is life-threatening; More than two thousand deaths, year-over-year statistics | रेल्वे प्रवास ठरतोय जीवघेणा; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, वर्षभरातील आकडेवारी

रेल्वे प्रवास ठरतोय जीवघेणा; दोन हजारांहून अधिक जणांचा मृत्यू, वर्षभरातील आकडेवारी

Next

मुंबई : रेल्वे रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात २ हजारांहून अधिक प्रवाशांनी जीव गमावल्याचे माहिती अधिकारात समोर आले आहे. मात्र माहिती अधिकारातून मिळालेल्या माहितीतही तफावत आहे. एका आरटीआय कार्यकर्त्याला रेल्वे रूळ ओलांडताना तसेच लोकलमधून पडून २ हजार १२३ प्रवाशांचा जीव गमवल्याची माहिती देण्यात आली आहे. तर दुसऱ्या आरटीआय कार्यकर्त्याला याच कारणास्तव २ हजार ६६४ प्रवाशांनी जीव गमाविल्याची माहिती देण्यात आली आहे. माहितीत तफावत असली तरी रेल्वे प्रवास जीवघेणा ठरत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे.
रूळ ओलांडताना आणि लोकलमधून पडून जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या काळात २ हजार १२३ प्रवाशांचा मृत्यू झाला. तर, याच काळात १ हजार ७५८ प्रवासी जखमी झाले.
मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार, मध्य रेल्वे मार्गावर रेल्वे रूळ ओलांडणे, गाडीतून पडणे यामुळे एकूण १ हजार ३८४ प्रवाशांची मृत्यू आणि १ हजार ४७ प्रवासी जखमी झाले. तर, पश्चिम रेल्वे मार्गावर याच कारणांमुळे एकूण ७३९ प्रवाशांचा मृत्यू झाला असून ७११ प्रवासी जखमी झाले आहेत.
मुंबई उपनगरीय रेल्वे ट्रॅकवर रेल्वे रुळ ओलांडताना किंवा ट्रॅक ओलांडताना २०१३ पासून ते २०१८ पर्यंत एकूण १९ हजार 2४३० प्रवाशांनी जीव गमावला असून २० हजार १६८ प्रवासी जखमी झाले आहेत.

आरटीआयने दिलेल्या माहितीत तफावत
मुंबई लोहमार्ग पोलिसांकडून माहिती अधिकार कार्यकर्ते शकील शेख यांनी माहितीच्या अधिकारातून मिळविलेल्या माहितीनुसार, रेल्वे प्रवासात २ हजार १२३ प्रवाशांनी गमावला जीव गमावला आहे. मात्र या माहितीतही तफावत आहे. कारण याच कालावधीत म्हणजे जानेवारी २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत माहिती अधिकार कार्यकर्ते समीर झवेरी यांना माहिती अधिकार कायद्यांतर्गत माहिती मागविली. यात मिळालेल्या माहितीनुसार रेल्वे रूळ ओलांडून आणि लोकलमधून पडून २ हजार ६६४ प्रवाशांनी आपला जीव गमाविला. तर, ३ हजार १५८ प्रवासी जखमी झाले. मध्य रेल्वे मार्गावर एकूण १ हजार ३९३ प्रवाशांचा मृत्यू आणि १ हजार ८३६ प्रवासी जखमी झाले. पश्चिम रेल्वे मार्गावर मार्गावर एकूण ९२८ प्रवाशांचा मृत्यू आणि १ हजार ३२२ प्रवासी जखमी झाले आहेत. आरटीआयने दिलेल्या माहितीत तफावत असली तरी रेल्वे प्रवास जीवघेणा ठरत असल्याचे नाकारता येत नाही.

Web Title: Train travel is life-threatening; More than two thousand deaths, year-over-year statistics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.