Traffic changes today, Mumbai Traffic Police Information | महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज वाहतुकीत बदल, मुंबई वाहतूक पोलिसांची माहिती
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आज वाहतुकीत बदल, मुंबई वाहतूक पोलिसांची माहिती

मुंबई : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा शुक्रवार, ६ डिसेंबर रोजी ६३ वा महापरिनिर्वाण दिन आहे. त्यानिमित्ताने या महामानवाला अभिवादन करण्यासाठी त्यांचे अनुयायी चैत्यभूमी, दादर परिसरात मोठ्या प्रमाणात येतात. त्यामुळे परिसरात वाहनांची गर्दी होऊन वाहतूककोंडी होण्याची शक्यता असते. हे लक्षात घेऊन येथील वाहतुकीत काही बदल करण्यात आले आहेत.
वाहतूककोंडी होऊन अनुयायांची गैरसोय होऊ नये म्हणून शिवाजी पार्क, दादरकडे जाणाऱ्या वाहतुकीचे नियमन करण्यासाठी वाहतूक निर्बंध लादण्यात आले आहेत. तसेच येथील वाहतुकीत काही महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत, अशी माहिती मुंबई वाहतूक पोलिसांनी दिली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त येथील काही मार्ग एक दिशा करण्यात आले असून ८ मार्गांवर पार्किंगसाठी निर्बंध घालण्यात आले असल्याचे वाहतूक पोलिसांनी सांगितले.
चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाºया अनुयायांची गैरसोय टाळण्यासाठी वाहनचालकांनी वाहतुकीच्या नियमानुसार पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांनी केले आहे.

अन्नदान करणाऱ्यांसाठी व्यवस्था
वाहनातून अन्नदान करणाºयांसाठी स्वतंत्र व्यवस्था करण्यात आली आहे. यासाठी पास घेतलेल्यांना शिवाजी पार्क, केळुस्कर उत्तर गेट क्रमांक सहा येथून प्रवेश दिला जाईल. माहीम येथून येणारे दिलीप गुप्ते मार्गाचा वापर करू शकतात. आपत्कालीन स्थितीत वाहनांसाठी सिद्धिविनायक मंदिर ते कापड बाजार ही मार्गिका मोकळी ठेवण्यात आली आहे.

पार्किंगला बंदी
- एस. व्ही.एस. रोड
- रानडे रोड
- न. चिं. केळकर मार्ग
- केळुस्कर मार्ग (दक्षिण, उत्तर)
- गोखले रोड (दक्षिण, उत्तर)
- टिळक ब्रिज
- एस.के. बोले मार्ग
- भवानी शंकर रोड

एक दिशा मार्ग
- एस.के. बोले रोड
- भवानी शंकर रोड
- स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग

वाहतुकीसाठी
बंद रस्ते
- रानडे रोड
- ज्ञानेश्वर रोड
- एस. व्ही. रोड
पार्किंगसाठी रस्ते
- सेनापती बापट मार्ग
- कामगार मैदान, सेनापती बापट मार्ग, इंडिया बुल्स फायनान्स सेंटर
- आदर्शनगर स्पोटर््स ग्राउंड वरळी
- पंच उद्यान माटुंगा -
रेती बंदर माहीम
- लखमशी नप्पू रोड
- आर.ए.के. रोड, वडाळा
- इंडिया बुल्स सेंटर, ज्युपिटर मिल कंपाउंड
- लोढा अपोलो मिल कंपाउंड
- कोहिनूर स्क्वेअर, कोहिनूर मिल कंपाउंड

Web Title: Traffic changes today, Mumbai Traffic Police Information

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.