१ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 09:53 IST2025-01-07T12:35:57+5:302025-01-09T09:53:06+5:30

टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी आठवड्याभरात घसघशीत परतावा देण्याचे आमिष दाखवून हजारो मुंबईकरांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे.

Torres Company employees defrauded thousands of investors by promising to pay them back at 11 percent interest in a week | १ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम

१ लाखाचे ११ महिन्यात ५ लाख; अशी होती ग्राहकांना चुना लावणाऱ्या टोरेस कंपनीच्या कर्मचाऱ्यांची स्किम

Torres Fraud:  टोरेस नावाच्या आर्टिफिशल डायमंड विक्री करणाऱ्या कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी अकरा टक्के व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार मुंबईत उघडकीस आला आहे. कंपनीचे ऑफिस बंद झाल्याचे कळताच गुंतवणूकदारांनी विविध कार्यालयाबाहेर गर्दी केली होती. त्यानंतर टोरेस कंपनीच्या संचालक, मॅनेजरसह पाच जणांविरुद्ध हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गेल्या वर्षभरात आतापर्यंत १३ कोटींची फसवणूक झाल्याचा आरोप असून हा आकडा आणखीन वाढण्याची शक्यता पोलिसांकडून वर्तविण्यात येत आहे. मात्र गुतवणूकदारांना जास्त पैशांचे आमिष दाखवून ही फसवणूक करण्यात आल्याचे समोर आलं आहे.

गुंतवणूकदारांच्या म्हणण्यांनुसार, जवळपास दोन वर्षे टोरेस नावाची कंपनी दादरमध्ये सुरू झाली होती. या कंपनीने पैसे दुप्पट करून देणार असल्याचे सांगितल्याने लोकांनी हळूहळू त्यात गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. तुमचे पैसे एक आठवड्यात ७ टक्क्यांनी वाढतील असं कंपनीतल्या अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानुसार गुंतवणूकदारांना २ महिने ७ टक्क्याने पैसे मिळत होते. तसेच कंपनीने त्यांचे ॲपदेखील तयार केले होते. ज्यावरुन तुम्हाला किती आणि कधी पैसे मिळणार हे गुंतवणूकदारांना समजत होतं. लोकांना त्यांच्या गुंतवणुकीच्या बदल्यात एक मोईसिनाट स्टोन त्यांनी गुंतवलेल्या रकमेनुसर दिला जायचा.

सुरुवातीच्या काळात टोरेस कंपनीने गुंतवणूकदारांना उच्चभ्रू इमारतीत घरे, गाड्या आणि दागिने अशा आकर्षक परताव्याचे आमिष दाखवलं होतं. अवघ्या काही दिवसांमध्ये व्याजासह संपूर्ण रक्कम परत मिळेल, यामुळे गुंतवणुकदार निश्चिंत होते. तसेच आठवड्याला पैसे येत असल्याने कंपनीने गुंतवणूकदारांचा विश्वास देखील जिंकला होता. त्यानतंर काही महिन्यांपूर्वी टोरेस कंपनीने गुंतवणूक केलेल्या पैशांवर एका आठवड्यात ११ टक्के व्याजासह मिळतील अशी स्कीम जाहीर केली. त्यामुळे गुंतवणूकदारांनी अजून पैसे गुंतवले. मात्र दोन आठवड्यांपासून पैसे न मिळाल्याने गुंतवणूकदारांनी थेट ऑफिस गाठल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आला.


आठवड्याला मिळणार ११ टक्के व्याज

"कंपनीतील अधिकाऱ्यांनी आठवड्याला गुंतवणकदाराने भरलेल्या पैशांवर ११ टक्के व्याज येणार असं सांगितले होते. ११ टक्के देणार असं सांगितल्या आम्ही पाच लाख रुपये गुंतवले होते. आम्हाला आमच्या मेहनतीचे पैसे परत भेटायला हवेत. आम्हाला तुम्ही जे पैसे देत आहात त्या बदल्यात आम्ही तुम्हाला एक खडा देऊ. त्यानुसार तुम्हाला बोनस मिळेल. जेवढे तुम्ही पैसे टाकता आहात त्याचे ११ टक्के कॅशबॅक तुम्हाला आठवड्याला मिळेल. समजा १ लाख टाकले तर दर आठवड्याच्या सोमवारी तुम्हाला ११ रुपये मिळणार. असे ५२ आठवडे पैसे देणार असल्याचे त्यांनी सांगितले होते," असं फसवणूक झालेल्या गुंतवणूकदाराने म्हटलं.

दरम्यान, याप्रकरणी पोलिसांनी पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये सर्वेश सुर्वे, व्हिक्टोरिया कोवालेन्का, तौफिक रियाझ उर्फ जॉन कार्टर, तानिया कॅसातोवा, व्हॅलेंटिना कुमार यांचा समावेश आहे.

Web Title: Torres Company employees defrauded thousands of investors by promising to pay them back at 11 percent interest in a week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.