Join us
Daily Top 2Weekly Top 5

मोदींच्या हस्ते आज तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनाचे भूमिपूजन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 06:45 IST

या तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या शनिवारी वांद्रे-कुर्ला-संकुलामध्ये (बीकेसी) मेट्रो-१०, मेट्रो-११, मेट्रो-१२ या तीन मेट्रो मार्गिकांचे भूमिपूजन करण्यात येणार आहे. गायमुख ते शिवाजी चौक (मीरा रोड) मेट्रो-१० आणि कल्याण ते तळोजा मेट्रो-१२ महानगर प्रदेशातील चाकरमान्यांसाठी तर वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल मेट्रो-११ ही मार्गिका वडाळ्याहून दक्षिण मुंबईकडे प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी उपयोगी ठरणार आहे.

या तीन मेट्रो मार्गिकांसह मेट्रो भवनाचेही पंतप्रधानांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. १५४ मीटर उंच ३२ मजल्यांच्या या इमारतीमधून मुंबई आणि महानगर प्रदेशामध्ये भविष्यात निर्माण होणाºया ३३७ किमी लांबीच्या मेट्रो मार्गिकांवर नियंत्रण ठेवण्यात येणार आहे. बीकेसीमध्ये मेक इन इंडिया कार्यक्रमांतर्गत बनवण्यात आलेला पहिला मेट्रो कोच प्रदर्शनासाठी ठेवण्यात आला आहे. हा अत्याधुनिक कोच बनवण्यासाठी सर्वसाधारणपणे ३६५ दिवस लागतात. मात्र हा कोच केवळ ७५ दिवसांमध्ये बनवण्यात आला. प्राधिकरणाने अशा प्रकारचे पाचशेपेक्षा जास्त कोच दहिसर ते डी.एन. नगर या मेट्रो-२ अ आणि अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) या मेट्रो-७ मार्गिकांच्या प्रवाशांसाठी मागविले आहेत.या अत्याधुनिक मेट्रो कोचची काही वैशिष्ट्ये आहेत. यामध्ये दिव्यांग व्यक्तींसाठी विशेष व्यवस्था आहे. तसेच दरवाजे, निरीक्षण, अडथळे, धूर, आग यासाठी स्वयंचलित यंत्रणा आहेत. अंधेरी (पूर्व) ते दहिसर (पूर्व) मेट्रो-७ या मार्गिकेवरील बाणडोंगरी स्थानकाचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. यासोबतच महामुंबई मेट्रोची ब्रॅण्ड व्हिजन पुस्तिकेचे ही प्रकाशन करण्यात येणार आहे.या प्रकल्पांचे होणार उद्घाटनमेट्रो-१०-च्गायमुख- शिवाजी चौक (मीरा रोड), लांबी-९.२०९ किमी., प्रकल्प खर्च- ४ हजार ४७६ कोटी रुपये.च्मार्गावरील स्थानके - गायमुख, गायमुख रेतीबंदर, वर्सोवा चार फाटा, काशिमीरा, शिवाजी चौक.मेट्रो-११-च्वडाळा ते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल, लांबी- १२.७७४ किमी., प्रकल्प खर्च- ८ हजार ७३९ कोटी रुपये.च्मार्गावरील स्थानके - वडाळा आरटीओ, गणेशनगर, बीपीटी हॉस्पिटल, शिवडी मेट्रो, हे बंदर, कोल बंदर दारू खाना, वाडी बंदर, क्लॉक टॉवर, कारनॅक बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल.मेट्रो-१२ -कल्याण ते तळोजा, लांबी- २०.७५६ किमी, प्रकल्प खर्च- ५ हजार ८६५ कोटी " च्मार्गावरील स्थानके- ए.पी.एम.सी., कल्याण, गणेशनगर, पिसवली गाव, गोळवली, डोंबिवली एम.आय.डी.सी.,सागाव, सोनारपाडा, मानपाडा, हेदुटणे, कोळेगाव, निळजे गाव, वडवली, बाले, वलकण, तुर्भे, पिसावे, तळोजा. 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनरेंद्र मोदीमेट्रो