Join us
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या गावी जायचं! मराठवाडा, कोकणसाठी विशेष रेल्वे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2024 13:20 IST

मध्य रेल्वेकडून मेल, एक्स्प्रेसच्या अतिरिक्त फेऱ्या

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : परीक्षा संपल्याने मुलांची उन्हाळी सुटीत मामाच्या गावाला जाण्याची लगबग सुरू झाली आहे. या प्रवाशांसोबत राज्यासह राज्याबाहेर उन्हाळी सुटीत गावी जाण्यासाठी रीघ वाढत असून, या प्रवाशांकरिता मध्य रेल्वेने मेल, एक्स्प्रेसच्या अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला असून, यात उन्हाळी विशेष गाड्यांचीही भर घालण्यात आली आहे. मराठवाडा, खान्देश आणि कोकणातील चाकरमान्यांना गावी जाण्यासाठी या विशेष रेल्वे गाड्यांचा फायदा होणार आहे.

मध्य रेल्वे मुंबई-करीमनगरदरम्यान १६ अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन चालवणार आहेत. प्रवाशांची अतिरिक्त गर्दी लक्षात घेऊन मध्य रेल्वेने १६ अतिरिक्त साप्ताहिक उन्हाळी विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतला आहे. 

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-करीमनगर साप्ताहिक विशेष १६ फेऱ्या असणार आहेत. ०१०६७ साप्ताहिक विशेष गाडी ९ एप्रिल आणि २८ मेपर्यंत दर मंगळवारी १५:३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी ८:३० वाजता करीमनगर येथे पोहोचेल. या गाडीच्या ८ फेऱ्या होतील. ०१०६८ साप्ताहिक विशेष गाडी १० एप्रिल आणि २९ मेपर्यंत दर बुधवारी १९:०५ वाजता करीमनगर येथून सुटेल आणि दुसऱ्या दिवशी १३:४० वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे पोहोचेल. या गाडीच्या ८ फेऱ्या होतील. या गाड्यांना दादर, ठाणे, कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, छत्रपती संभाजीनगर, जालना, परभणी, पूर्णा, नांदेड, मुदखेड, धर्माबाद, बासर, निजामाबाद, आर्मूर, मेटपल्ली, कोरूटला, असे थांबे आहेत.

 मध्य रेल्वे मुंबई मऊ/कोच्चुवेलीदरम्यान २८ अतिरिक्त उन्हाळी विशेष ट्रेन चालविल्या जाणार आहेत.  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस-मऊ विशेष ४ फेऱ्या असतील. ०१०७९ विशेष गाडी १० एप्रिल रोजी आणि १ मे रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथून २२:३५ वाजता सुटेल आणि मऊ येथे तिसऱ्या दिवशी ११:१० वाजता पोहोचेल. 

याठिकाणी थांबे०१०८० ही विशेष गाडी १२ एप्रिल आणि ३ मे रोजी मऊ येथून १३:१० वाजता सुटेल आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी ००:४० वाजता पोहोचेल. या गाडीच्या २ फेऱ्या होतील. या गाड्यांना दादर, ठाणे कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झासी, उरई, गोविंदपुरी, फतेहपूर, प्रयागराज, जंघई, जौनपूर, शाहगंज आणि आजमगड हे थांबे असतील, अशी माहिती रेल्वेकडून देण्यात आली आहे.

एलटीटी-कोच्चुवेली विशेष २४ फेऱ्याएलटीटी-कोच्चुवेली विशेष २४ फेऱ्या चालविल्या जातील. ०१४६३ विशेष ११ एप्रिल ते २७ जूनपर्यंत गुरुवारी एलटीटी येथून १६:०० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २०:४५ वाजता कोच्चुवेली येथे पोहोचेल. 

०१४६४ साप्ताहिक विशेष कोच्चुवेली १३ एप्रिल ते २९ जूनपर्यंत दर शनिवारी १६:२० वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी २१:५० वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल. या गाड्यांना ठाणे, पनवेल, रोहा, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, सिंधुदुर्ग, सावंतवाडी, मडगाव, कारवार, कुमटा, कुंदापुरा, उडुपी, मंगळुरू जंक्शन, कासरगोड, कण्णूर, कोषिक्कोड, तिरूर, षोरणूर, त्रिसूर आदी थांबे असतील.

टॅग्स :मुंबईरेल्वेमराठवाडा