Sachin Vaze: जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझेंच्या स्टेटसने खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: March 13, 2021 11:05 AM2021-03-13T11:05:08+5:302021-03-13T11:33:38+5:30

Mansukh Hiren Case: The time to say goodbye to the world is approaching; Sachin Vaze's WhatsApp shocking post- सचिन वाझेंची (Sachin Vaze) धक्कादायक पोस्ट व्हायरल झाली आहे.

The time to say goodbye to the world is approaching; Sachin Vaze's WhatsApp shocking post | Sachin Vaze: जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझेंच्या स्टेटसने खळबळ

Sachin Vaze: जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे; सचिन वाझेंच्या स्टेटसने खळबळ

googlenewsNext

मुंबई: मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणांत (Mansukh Hiren Case) चौकशीच्या घेऱ्यात अडकलेले गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाचे सचिन वाझे यांची (sachin Vaze)   दहशतवाद विरोधी पथक (ATS) ने तब्बल दहा तास चौकशी केली आहे.  प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया निवासस्थानाबाहेर स्फोटके आणि धमकीचे पत्र असलेली स्कॉर्पिओ कार सापडली. याचा तपास वाझे यांच्याकडे सोपविण्यात आला. या स्कॉर्पिओ कारचा ताबा असलेल्या ठाण्यातील व्यापारी मनसुख यांचा मृत्यू झाला आणि वाझे संशयाच्या भोवऱ्यात सापडले. विरोधी पक्षाने त्यांचे निलंबन करुन अटकेची मागणी केली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हा तपास राज्य दहशतवाद विरोधी पथकाकडे (एटीएस) सोपविला. 

विरोधकाच्या आक्रमक  पवित्र्यानंतर अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी गृहमंत्र्यांनी वाझे यांची बदली करण्याचे आदेश दिले. त्यानंतर वाझे यांची बदली कुठे होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. अखेर, शुक्रवारी त्यांची विशेष शाखा १ येथे बदली करण्यात असून त्यांच्याकड़े नागरी सुविधा केंद्राची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. अशात बदली झाल्यानंतर वाझे यांनी प्रतिक्रिया देताना, मी क्राईम ब्रान्चच्या सेवेतून मुक्त झालो असे सांगत जास्त बोलणे टाळले होते. मात्र आज सचिन वाझेंनी व्हॉट्सअॅपवर एक धक्कादायक पोस्ट शेअर केली आहे. The time to say goodbye to the world is approaching; Sachin Vaze's WhatsApp shocking post

3 मार्च 2004 रोजी सीआयडीमधील काही अधिकाऱ्यांनी मला एका खोट्या प्रकरणात अटक केली होती. मला केलेली ही अटक आजपर्यंत अयोग्य आहे. या इतिहासाची मला आता पुन्हा जाणीव करुन देत आहे. माझे सहकारी- अधिकारी मला चुकीच्या प्रकरणात अडकविण्याचा प्रयत्न करत आहेत, असा दावा सचिन वाझे यांनी व्हॉट्सअॅप स्टेटसद्वारे केला आहे. 

सचिन वाझे पुढे म्हणाले की, सध्याच्या परिस्थितीत थोडा फरक आहे. 17 वर्ष माझ्याकडे अपेक्षा, सहनशीलता, आयुष्य आणि नोकरीही होती, पण आता माझ्याकडे आयुष्याची 17 वर्षेही नाहीत, ना नोकरी, ना जगण्याची अपेक्षा आहे, असं सचिन वाझे यांनी म्हटलं आहे. तसेच जगाचा निरोप घेण्याची वेळ जवळ येत आहे, असं विधानही सचिन वाझेंनी केल्यानं सर्वत्र खळबळ उडाली आहे. सचिन वाझेंच्या पोस्टनंतर वरिष्ठ अधिकारी त्यांच्या संपर्कात असून त्यांनी सचिन वाझेंना पोस्टही डिलीट करण्यास सांगितले आहे.

सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली  

सचिन वाझे (Sachin Vaze)  यांची आधी नागरी सुविधा केंद्रात (सिटीझन फॅसिलिटेशन सेंटर ) विभागात बदली करण्यात आली होती. यासंदर्भात पोलीस मुख्यालयातून गुरुवारी रात्री अधिकृत पत्रक निघाले होते. मात्र, त्यानंतर लगेच त्यांची एसबी-1 म्हणजेच विशेष शाखेत त्यांची कागदोपत्री बदली करण्यात आली आहे. दरम्यान, सचिन वाझे यांची एकाच दिवसात दोनदा बदली झाली होती.

कोण आहेत सचिन वाझे?

  • सचिन वाझे 1990 मध्ये सब इन्स्पेक्टर म्हणून मुंबई पोलिसात ज्वाईन झाले होते. त्यांनी आतापर्यंत 63 एन्काऊंटर केले आहेत.
  • नुकतंच Republic TV चे संपादक अर्णब गोस्वामी यांना त्यांनी घरातून अटक केली होती. गोस्वामींच्या अटकेसाठी तयार केलेल्या टीमचं नेतृत्व सचिन वाझे यांनी केलं होतं.
  • सचिन वाझे जवळपास 13 वर्षांनंतर 6 जून, 2020 रोजी पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले आहेत. त्यांनी 2007 मध्ये मुंबई पोलिसातून राजीनामा दिला होता.
  • सचिन वाझे यांनी छोटा राजन आणि दाऊद इब्राहिमच्या अनेक गुंडांचा एन्काऊंटर केला आहे. एनकाउंटर स्पेशलिस्ट प्रदीप शर्मा त्यांचे बॉस होते.
  • सचिन वाझेंसह 14 पोलिस कर्मचाऱ्यांना 2004 मध्ये सस्पेंड करण्यात आलं होतं. या सर्वांवर 2002 घाटकोपर ब्लास्टचा आरोपी ख्वाजा यूनिसच्या कस्टोडियल डेथचा आरोप होता.
  • सस्पेंशन काळ संपल्यानंतर नाराज होत त्यांनी 2007 मध्ये पोलिस फोर्सचा राजीनामा दिला.
  • 30 नोव्हेंबर 2007 रोजी त्यांनी मुंबई पोलिसांची नोकरी सोडल्यानंतर 2008 मध्ये शिवसेनेत प्रवेश केला होता.
  • 2020 मध्ये कोरोना महामारीच्या काळात सचिन वाझे पुन्हा पोलिस फोर्समध्ये परतले.

Web Title: The time to say goodbye to the world is approaching; Sachin Vaze's WhatsApp shocking post

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.