मुंबईत लोकलच्या धडकेत तीन महिलांचा मृत्यू, मालाड रेल्वे स्टेशनजवळ झाला दुर्देवी अपघात
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2017 15:41 IST2017-11-18T14:07:46+5:302017-11-18T15:41:57+5:30
रेल्वे ट्रॅकवर काम करणा-या तीन महिलांचा शनिवारी लोकलच्या धडकेत मृत्यू झाला.

मुंबईत लोकलच्या धडकेत तीन महिलांचा मृत्यू, मालाड रेल्वे स्टेशनजवळ झाला दुर्देवी अपघात
मुंबई - रेल्वे ट्रॅकवर काम करणा-या तीन महिलांचा शनिवारी लोकलच्या धडकेत मृत्यू झाला. पश्चिम रेल्वे मार्गावरील मालाड रेल्वे स्थानकाजवळ ही दुर्देवी घटना घडली. लोकलने एकूण चार महिलांना धडक दिली. त्यात एक महिलेची प्रकृती गंभीर असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
बोरिवली-चर्चगेट लोकल मालाडच्या दिशेने जात असताना दुपारी पावणेएकच्या सुमारास हा अपघात झाला. महिला रेल्वे ट्रॅकवर दुरुस्तीचे काम करत असताना लोकलचा अंदाज न आल्याने ही दुर्देवी घटना घडली.
3 women killed, one critically injured after hit by Bandra-Indore Express while trying to cross a Railway track in Mumbai's #Maladpic.twitter.com/99rWiYl1Cj
— ANI (@ANI) November 18, 2017