३० ते ४० जणांनी तलवारीने केला हल्ला, ३ जण जखमी; मुंबईतील ताडदेवमधील घटना

By मुकेश चव्हाण | Published: April 4, 2023 11:32 AM2023-04-04T11:32:52+5:302023-04-04T15:18:32+5:30

ताडदेवमधील जनता नगरमध्ये राहणाऱ्या तीन जणांवर ३० ते ४० जणांनी तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे.

Three people were attacked with swords by 30 to 40 people; Incident in Tardeo | ३० ते ४० जणांनी तलवारीने केला हल्ला, ३ जण जखमी; मुंबईतील ताडदेवमधील घटना

३० ते ४० जणांनी तलवारीने केला हल्ला, ३ जण जखमी; मुंबईतील ताडदेवमधील घटना

googlenewsNext

मुंबई: मुंबईच्या ताडदेव भागात सोमवारी रात्री एक धक्कादायक घटना घडली. जनता नगरमध्ये राहणाऱ्या तीन जणांवर ३० ते ४० जणांनी तलवारीने हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे. सदर घटना काल रात्री म्हणजेच ३ एप्रिल रोजी घडली असून ताडेदव पोलिसांनी याप्रकरणी ३ जणांना ताब्यात घेतलं आहे. 

जनता नगरमध्ये अचानक रात्री ३० ते ४० जण आले. त्यानंतर त्यांनी इमारती खाली बसलेल्या एकाला मारहाण करण्यास सुरुवात केली. बचावासाठी मध्यस्थी करणाऱ्या दोन जणांना देखील आरोपींना मारहाण केली. या घटनेत तिघांपैकी दोन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. एकाच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे. तर एकाच्या पायाला दुखापत झाली आहे. दोघांनाही तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. त्यांच्याकडे तलवारी आणि चॉपर्स देखील होते, अशी माहिती तक्रारदार यांनी दिली. 

घटनेसंदर्भात माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत कारवाई केली. पोलिसांनी हल्लेखोरांपैकी तिघांना अटक केली आहे. तर अन्य लोकांचा पोलिसांकडून शोध सुरू आहे, अशी माहिती ताडदेव पोलीस स्थानाकाचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक विवेक शेंडे यांनी दिली. तसेच हल्ला करणाऱ्यांवर भारतीय दंड संहिता १८६० अधिनियमाद्वारे ३२४, ३२३, ५०४, १४३, १४४, १४७, १४८, १४९ कलम दाखल करण्यात आल्याची माहिती विवेक शेंडे यांनी दिली. 

Web Title: Three people were attacked with swords by 30 to 40 people; Incident in Tardeo

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.