परळ पुलावर डंपर-दुचाकीमध्ये भीषण अपघात; दोन तरुणींसह तिघांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 16, 2024 11:29 IST2024-01-16T09:42:39+5:302024-01-16T11:29:52+5:30
Parel Bridge Accident: दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली.

परळ पुलावर डंपर-दुचाकीमध्ये भीषण अपघात; दोन तरुणींसह तिघांचा मृत्यू
नेहमी गजबजलेल्या परळ पुलावर सकाळी सव्वासहाच्या सुमारास भीषण अपघात झाला. यामध्ये दुचाकीवरून ट्रिपलसीट जाणाऱ्या दोन तरुणी आणि एका तरुणाचा मृत्यू झाला आहे. दुचाकी आणि डंपरमध्ये ही धडक झाली आहे. भोईवाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले आहेत.
दुचाकीची धडक डंपरला बसली. यामुळे दुचाकीवरील तिघेजण रस्त्यावर कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली. यातच त्यांचा मृत्यू झाला. मृतांपैकी दोघांची ओळख पटली असून तनिष पतंगे (24), रेणुका ताम्रकर (25) अशी त्यांची नावे आहेत.
डोक्याला गंभीर दुखापत झाली होती. केईएममध्ये त्यांना उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.