Mukesh Ambani: मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना ३ तासात संपवून टाकू; ८ वेळा धमकीचा फोन, पोलीस सतर्क!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2022 12:35 IST2022-08-15T12:34:35+5:302022-08-15T12:35:57+5:30
देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रूपचे मालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

Mukesh Ambani: मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना ३ तासात संपवून टाकू; ८ वेळा धमकीचा फोन, पोलीस सतर्क!
मुंबई-
देशातील सुप्रसिद्ध उद्योगपती आणि रिलायन्स ग्रूपचे मालक मुकेश अंबानी यांना पुन्हा एकदा जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मुकेश अंबानी आणि त्यांच्या कुटुंबीयांना येत्या तीन तासात संपवून टाकू असा धमकीचा फोन रिलायन्श फाऊंडेशन रुग्णालयात आला आहे. महत्वाची बाब अशी की सकाळपासून तब्बल ८ वेळा असा धमकीचा फोन आला आहे. त्यामुळे मुंबई पोलिसांना याची माहिती देण्यात आली आहे.
मुंबई पोलिसांनी याप्रकरणी आता तातडीनं तपासाला सुरुवात केली असून नंबर ट्रेस केला जात आहे. तसंच मुंबई पोलिसांची एक टीम आता अंबानी यांचं निवासस्थान असलेल्या अँटेलिया परिसरातही पोहोचली आहे. अँटेलिया परिसरात पोलिसांकडून पाहणी केली जात आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार मुंबईतील रिलायन्स फाऊन्डेशन रुग्णालयातील लँड लाइनवर आज सकाळपासून आठ वेळा धमकीचा फोन आला आहे. फोनवर मुकेश अंबानी आणि कुटुंबीयांना जीवे मारू अशी धमकी दिली गेली. रुग्णालय प्रशासनानं याची दखल घेत मुंबई पोलिसांना माहिती दिली. त्यानंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत.